Khelo India : हॉकीमध्ये हरियानाला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 January 2019

मुंबई : मुलांच्या 17 वर्षांखालील हरियानाने सुवर्णपदकावर नाव कोरले. मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर  झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा 1-0 असा पराभव केला.

विश्रांतीपर्यंत दोन्ही संघ सावध खेळ करताना दिसले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला होता. विश्रांतीनंतर मात्र पहिल्याच सत्रात हरियानाने मिळालेल्या संधीचे सोने केले.

सामन्याच्या 40 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचे त्यांनी गोलात रुपांतर केले. योगेश सिंग याने हा गोल केला. त्यानंतर पुन्हा बचावाकडे लक्ष पुरवित त्यांनी आघाडी निसटणार नाही याची काळजी घेतली. पंजाबच्या आक्रमकांनी खासे प्रयत्न केले. पण त्यांना हरियानाचा बचाव भेदता आला नाही. 

ओडिशाने चुरशीच्या लढतीत शूटआऊटमध्ये उत्तर प्रदेशाचे आव्हान 3-2 असे परतवून लावत ब्राँझपदक मिळविले. नियोजित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. शूट आऊटमध्ये ओडिशाकडून लुगुन लबान, जोजो सुनील आणि सुनीत लाक्रा यांनी गोल केले. उत्तर प्रदेशाच्या चंदन यादव आणि दीपक पटेल यांनाच गोल करण्यात यश आले.

​ ​

संबंधित बातम्या