मॉड्रिचला गोल्डन बॉल, हॅरी केनला गोल्डन बूट

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने यंदाचा गोल्डन बूट पटकावला आहे. क्रोएशियाचा लुका मॉड्रिच हा मालिकेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला असून तो यंदाच्या गोल्डन बॉलचा मानकरी ठरला आहे. 

मॉस्को : फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने यंदाचा गोल्डन बूट पटकावला आहे. क्रोएशियाचा लुका मॉड्रिच हा मालिकेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला असून तो यंदाच्या गोल्डन बॉलचा मानकरी ठरला आहे. 

बेल्जियमचा एडन हजार्ड याने सर्वोत्कृष्ठ खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले असून फ्रान्सचा अँतॉईन ग्रिजमन याने तिसरे स्थान पटकावले आहे.  

फ्रान्सचा किलिएन एम्बापे याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तर बेल्जियमचा थिबौट कौरटोईस हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ गोलरक्षक ठरला असून त्याला गोल्डन ग्लोव्हजने सन्मानित करण्यात आले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या