आयपीएलपर्यंत भारताचा 'हा' प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याचीही शक्‍यता असून, तसे झाल्यास तो पाच महिने मैदानाबाहेर राहील. त्यामुळेच तो आयपीएलपर्यंत क्रिकेटपासून लांब राहण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याचीही शक्‍यता असून, तसे झाल्यास तो पाच महिने मैदानाबाहेर राहील. त्यामुळेच तो आयपीएलपर्यंत क्रिकेटपासून लांब राहण्याची शक्यता आहे. 

INDvsSA : रोहितची तोफ धडाडणार; भारताची बॅटिंग

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्‍चर झाल्याचे सोमवारीच जाहीर करण्यात आले होते. पंड्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला मुकण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला दुबईत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही दुखापत झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये ज्या डॉक्‍टरचे उपचार घेतले त्यांच्याकडेच तो जाणार आहे. 

हार्दिक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाच्या स्वरूपात बसत नव्हता. त्यामुळे त्याची निवड झाली नाही; पण बंधू कृणाल याच्या नेतृत्वाखाली विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या बडोदा संघातही त्याचा समावेश नाही. याबाबत कुणीच जाहीर भाष्य करण्यास तयार नसले, तरी त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागणार नाही, अशीच सर्वांची आशा आहे. 

INDvsSA : भारताला पहिल्या डावात रोखले तरच थोड्या आशा नाहीतर...

पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आहे. त्यामुळे हार्दिक लवकरात लवकर तंदुरुस्त होणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हार्दिकला झटपट क्रिकेटमध्ये अधिकाधिक जबाबदारी पेलावी लागेल, असे भाष्य अलीकडेच केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या