सिक्स पॅक पांड्याचा मुंबईत जोरदार सराव सुरू

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सहा महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सहा महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या लॉकडाउनमुळे सामान्य जनतेसह खेळाडूंना देखील आपल्या घरातच अडकून राहावे लागले होते. त्यानंतर जून महिन्याच्या सुरवातीला केंद्र सरकारने देशातील लॉकडाउन टप्याटप्याने उठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक खेळाडूंनी देखील पुन्हा मैदानावर उतरत सरावाला सुरवात केली होती. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

देशातील कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या अमिरातीला रवाना होण्यापूर्वी मुंबईत सुरु असलेल्या संघाच्या सरावामध्ये सामील झाला आहे. सरावासाठी मैदानावर दाखल झालेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजीच्या नेट प्रॅक्टिसला सुरवात केली आहे. आयपीएलमध्ये फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या फलंदाजीचा सराव करत असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये पांड्या आगामी आयपीएल स्पर्धेसाठी नेट मध्ये प्रॅक्टिस करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सने या पोस्टला 'सावधान, कुंग फू पांड्या सध्या काम करत असल्याचे' मजेशीर कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Caution: Kung Fu Pandya at work . #OneFamily #IPL2020 @hardikpandya93

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

दरम्यान, यापूर्वी लॉकडाउन मध्ये घरातच जिमचा वर्कआऊट करण्यास हार्दिक पांड्याने सुरवात केली होती. व त्याचा व्हिडिओ देखील पांड्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. तर 19 सप्टेंबर पासून अमिरातीत सुरु होणाऱ्या स्पर्धेसाठी आयपीएलमधील सर्व संघ 20 ऑगस्टनंतर दुबईकडे रवाना होणार आहेत. यावेळेस सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.        


​ ​

संबंधित बातम्या