लवकरच जवळच्या स्टेडियममध्ये! काय? बघा तुम्हीच 

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

या व्हिडिओमध्ये तो फलंदाजी करताना उत्तुंग फटके मारताना दिसत आहे. त्यामुळे आता तो लवकरच संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक नोव्हेंबरपासून संघाबाहेर आहे. इंग्लंडमध्ये जाऊन त्याने शस्त्रक्रिया करुन घेतली आणि आता तो सरावालाही लागला आहे. 

मुंबई : भारतीय संघाला सध्या दुखापतींचे ग्रहण लागले आहे. जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर असे अनेक गोलंदाज सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यांच्या पुनरागमाची सर्वांनाच चिंता असताना भारतीय क्रिकेटप्रेमांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या पुनरागमनासाठी जोरदार तयारी करत असून तो लवकरच आपल्याला संघात खेळताना दिसू शकतो. काही दिवसांपूर्वी त्याने जिममधील ट्रेनिंगचा व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर आता त्याने मुंबईतील शरद पवार अकादमीमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

IPL 2020 : लिलावानंतर कोणत्या संघात कोणते खेळाडू, बघा पूर्ण लिस्ट

या व्हिडिओमध्ये तो फलंदाजी करताना उत्तुंग फटके मारताना दिसत आहे. त्यामुळे आता तो लवकरच संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक नोव्हेंबरपासून संघाबाहेर आहे. इंग्लंडमध्ये जाऊन त्याने शस्त्रक्रिया करुन घेतली आणि आता तो सरावालाही लागला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या