मला तुझी खूप आठवण येतीये; हार्दिकचा फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
Saturday, 2 November 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्याने टाकलेला प्रत्येक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतो. त्याने आज टाकलेल्या फोटोचेही तेच झाले. त्याने मला तुझी खूप आठवण येते असे कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आणि क्षणात तो तुफान व्हायरल झाला. 

मुंबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्याने टाकलेला प्रत्येक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतो. त्याने आज टाकलेल्या फोटोचेही तेच झाले. त्याने मला तुझी खूप आठवण येते असे कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आणि क्षणात तो तुफान व्हायरल झाला. 

INDvsBAN : 19 वर्षांचा गोलंदाज पडला रोहित-शिखरवर भारी

आता तुम्ही म्हणाल की हार्दिकने कोणासोबचा फोटो शेअर केला आहे?, त्याला नक्की कोणाची आठवण येत आहे? थांबा पुढील कोणताही विचार करण्याआधी आम्ही सांगतो की त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवाची खूप आठवण येत आहे. 

हार्दिकने धोनी आणि झिवासोबतच फोटो शेअर केला आहे. त्याला त्याने ''मला या चिमुकलीची (आणि या मोठ्या मुलाचीसुद्धा) आठवण येत आहे,'' अे कॅप्शन दिले आहे. हा फोटो थोड्याचवेळात प्रचंड व्हायरल झाला आहे. हार्दिक सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. तो बांगलादेशविरुद्ध होणाऱअया मालिकेला मुकणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या