हार्दिक पंड्या संघाबाहेर; दीपक चहरला संधी

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले असून, त्याच्याजागी दीपक चहरची निवड होण्याची शक्यता आहे.

दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले असून, त्याच्याजागी दीपक चहरची निवड होण्याची शक्यता आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना अचानक कोसळला होता. त्याला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्याला मैदानावर उभा राहणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावे लागले. हार्दिकच्या दुखापतीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर तो मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हार्दिकच्या दुखापतीबद्दल माहिती देताना तो खेळणार नसल्याचे सांगत दीपक चहरची संघात निवड केली आहे. चहरने आय़पीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच त्याला संघात निवडण्यात आले आहे.

संबंधित बातम्या