नताशाचे मॅटर्निटी फोटोशूट अन् हार्दिकचा रोमँटिक अंदाज.. चर्चा तर होणारच

सुशांत जाधव
Saturday, 25 July 2020

आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या जोडीने आता आणखी काही खास फोटो शेअर केले आहेत. 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत त्याने नताशासोबत अनेक हटके पोस्ट शेअर करत पत्नीवरील प्रेम व्यक्त केल्याचे आपण पाहिले आहे. दोघांच्यातील गोडव्याचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्याचा त्याचा धडाका अजूनही सुरुच आहे. आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या जोडीने आता आणखी काही खास फोटो शेअर केले आहेत. 

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

नताशाच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये हार्दिकही रोमँटिक पोझ देताना दिसते. हार्दिक-नताशा यांच्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु असून त्यांचे फोटो  व्हायरल होताना दिसत आहेत. भारतीय संघाची टेनिसपटू सानिया मिर्झा, भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल यांनी देखील त्याने शेअर केलेल्या फोटोवर लव्ह इमोजीसह रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळते. पांड्यांच्या चाहत्यांकडूनही या फोटोला चांगलीच पंसती मिळत आहे. यापूर्वी हार्दिकने 'यू कम्प्लीट मी।' या कॅप्शनसह नताशासोबतच्या फोटोही चांगलाच चर्चेत आला होता. मे महिन्याच्या अखेरीच हार्दिक-नताशा जोडीने आपल्या घरी नवा पाहुणा येणार असून त्या प्रसंगासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी पोस्ट शेअर केली होती. नताशा स्टॅन्कोविचने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली होती.

'पॉप'च्या खेळीनंतर सचिन आठवणीत रमला!

हार्दिक-नताशा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा.. हार्दिकने हटके अंदाजात केलेल प्रपोज त्यानंतर झटपट विवाह आणि गुड न्यूज यामुळे पांड्या वारंवार चर्चेत असतो. पाठदुखीमुळे भारतीय संघापासून दूर गेलेल्या हार्दिक पांड्याने शस्त्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपली प्रेयसीला हटके प्रपोज करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. एका  जहाजात त्याने नताशासमोर आपले प्रेम व्यक्त केले. झटपट साखरपूडा आणि लग्नाची बातमीही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चाहत्यांना दिली होती. 


​ ​

संबंधित बातम्या