INDvsAUS : अन् पंड्याने शरमेने मान खाली घातली

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला एकदिवसीय सामना उदया (शनिवार) सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी आज सरावानंतर पंड्याने चाहत्यांकडे दुर्लक्ष करत मान खाली घालून परतणे पसंत केले. 

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामना खेळण्यावर बंदी आणल्यानंतर सिडनी क्रिकेट मैदानावरुन भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या चाहत्यांसमोर मान खाली घालून जाताना दिसला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला एकदिवसीय सामना उदया (शनिवार) सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी आज सरावानंतर पंड्याने चाहत्यांकडे दुर्लक्ष करत मान खाली घालून परतणे पसंत केले. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना आज अखेर पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. 
 
संबंधित बातम्या