हार्दिक पांड्या आणि नताशाचा फोटो इन्स्टाग्रामने डिलीट केला आणि...   

टीम ई-सकाळ
Wednesday, 19 August 2020

नताशा स्टॅनकोविचने नुकतेच सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या तिच्या गालावर किस करत असल्याचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.

नताशा स्टॅनकोविचने नुकतेच सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या तिच्या गालावर किस करत असल्याचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. मात्र इन्स्टाग्रामने तिने शेअर केलेला हा फोटो मार्गदर्शक तत्त्वांच्या विरूद्ध असल्याचे सांगत हटवला होता. त्यानंतर हार्दिकबरोबरचा फोटो हटवल्याबद्दल नताशा इन्स्टाग्रामवर चांगलीच भडकल्याचे पाहायला मिळाले.  

पुढील महिन्यापासून संयुक्त अरब अमिरातीत सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा हार्दिक पांड्या मुबईच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यानंतर नताशा स्टॅनकोविचने हार्दिकच्या आठवणीत त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. परंतु हा फोटो मार्गदर्शक तत्त्वांच्या विरूद्ध असल्याचे म्हणत इन्स्टाग्रामने डिलीट केला. त्यामुळे नताशाने चिडून तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डिलीट केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट शेअर केला. व तसेच या स्टोरीवर तिने #alreadymissyou असे लिहीत, हार्दिक पांड्याला टॅग करून 'सिरिअसली इन्स्टाग्राम?' म्हटले. 

यासोबतच नताशाने इन्स्टाग्रामकडून फोटो डिलीट करण्याबाबत आलेल्या कारणाचा मजकूर देखील शेअर केला. ज्यामध्ये इन्स्टाग्रामने, ''आपले पोस्ट आमच्या कम्युनिटी  मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. आम्ही आपले पोस्ट काढले कारण ते आमच्या कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. आम्ही इन्स्टाग्रामवर आमच्या कम्युनिटीचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत,'' म्हटले होते. यानंतर नताशाने पुन्हा तोच फोटो कोणत्याही कॅप्शनविना अपलोड केला. त्यावेळेस मात्र इन्स्टाग्रामने हा फोटो हटवला नाही.          

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#alreadymissyou @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गेल्या काही दिवसांपूर्वीच  ट्विटरवरून बाबा बनल्याची गोड बातमी शेअर केली होती. हार्दिक पांड्या आणि नताशाने 1 जानेवारी 2020 ला साखरपुडा केल्याचे सांगितले होते. आणि त्यानंतर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड नताशासोबत लग्न केले होते. मुलगा झाल्यानंतर त्याला घरी आणण्यापूर्वी नताशा आणि हार्दिकने आपला हा आनंद रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांसह देखील साजरा केला होता.


​ ​

संबंधित बातम्या