हार्दिक पांड्या बनला बाबा, फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

हार्दिक पांड्या आणि नताशाने १ जानेवारी २०२० ला साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं. नताशा सार्बियाची असून बॉलिवूड अभिनेत्री आहे. 

मुंबई - भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने ट्विटरवरून आनंदाची बातमी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात गर्लफ्रेंड नताशासोबत लग्न केलं होतं. आता पांड्याला मुलगा झाला आहे. पांड्याने बाबा बनल्याची गोड बातमी ट्विटरवरून शेअर केली. पांड्याने बाळाचा फोटो शेअर केला आहे

पांड्याने ट्विट करताना म्हटलं की, घरी मुलगा जन्माला आला. पांड्यानं फोटो शेअर करताना मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. त्याने फक्त बाळाचा हात हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. 

याआधी हार्दिक पांड्याने नताशाच्या बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले होते. सोशल मीडियावरूनच त्याने लग्नाची माहिती दिली होती. नताशाने प्रेगनन्सीच्या काळात बेबी बम्पचे फोटोही पोस्ट केले होते. 

हार्दिक पांड्या आणि नताशाने १ जानेवारी २०२० ला साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं. नताशा सार्बियाची असून बॉलिवूड अभिनेत्री आहे. दोघांनी दुबईमध्येच साखरपुडा केला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत घरीच लग्न उरकलं होतं.


​ ​

संबंधित बातम्या