जाफरने अनमोल सेहवागकडे केला कानाडोळा, भज्जी म्हणाला असं का?

टीम ई-सकाळ
Wednesday, 10 June 2020

या दोघांना स्थान न दिल्यामुळे जाफरवर प्रश्नांचे बाउन्सर पडताना दिसताहेत. जाफर हा देशांतर्गत क्रिकेटमधील बाप माणूस म्हणून ओळखला जातो.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर वासीम जाफरने  (Wasim Jaffer) ट्विटरच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील ऑल टाइम इलेव्हन इंडियन टिम सांगितली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या पक्तींत त्याने आपल्या बिरादरीतील राहुल द्रविडला मात्र स्थान दिलेले नाही. एवढेच नव्हे तर भारतीय संघातील स्फोटक फंलदाज विरेंद्र सेहवागला त्याने टिम इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. या दोघांना स्थान न दिल्यामुळे जाफरवर प्रश्नांचे बाउन्सर पडताना दिसताहेत. जाफर हा देशांतर्गत क्रिकेटमधील बाप माणूस म्हणून ओळखला जातो. त्याने निवडलेल्या संघात सेहवागला स्थान नसल्याने अधिक आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!

विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडीने अनेक सामन्यात भारत्याच्या डावाची सुरुवात केल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळेच एका नेटकऱ्याला जाफरची निवड खटकली. त्याने विरेंद्र सेहवागला स्थान का नाही? असा प्रश्न जाफरला विचारला आहे. सेहवागच्या ऐवजी सलामीचा फलंदाज म्हणून जाफरने भारतीय संघाची बांधणी करणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीला स्थान दिले. तिसऱ्या क्रमांकावर त्याने हिटमॅन रोहित शर्माला पंसती दिली. तर चौथ्या क्रमांकाला त्याने विराट कोहलीवर भरवसा दाखवल्याचे दिसते.

अमेरिकेला लागलेत क्रिकेटचे 'डोहाळे'; T-20 वर्ल्डकपची करायचीय मेजवानी

अष्टपैलू म्हणून त्याने युवराज सिंग आणि 1983 मध्ये भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांचा आपल्या संघात समावेश केला आहे. आपल्या टिम इलेव्हनमध्ये पाच गोलंदाजाना स्थान देताना त्याने तीन फिरकीपटूंसह दोन जलदगती गोलंदाजांच्या नावाचा समावेश केलाय. यात रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, अनिल कुंबळे आणि झहिर खान यांचा सामावेश आहे.  जाफरने निवडलेल्या संघात सेहवागला स्थान नसल्यामुळे हरभजन सिंगलाही आश्चर्य वाटले आहे. त्यानेही सेहवागला तुझ्या संघात जागा नाही का? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. सेहवागने एकदिवसीयमध्ये 23 शतके आणि 32 अर्धशतकासह 8273 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्रिशतकी खेळी करण्याचा पराक्रम करणारा सेहवाग हा पहिला भारतीय फलंदाज होता. त्यामुळे सेहवागला जाफरने का डावलले असा प्रश्न क्रिकेट जाणकारांना पडलाय.


​ ​

संबंधित बातम्या