शास्त्रीजी, आता स्पष्टीकरण द्या: हरभजन

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

इंग्लंडमध्ये झालेल्या भारताच्या पराभवाची जबाबदारी प्रशिक्षकाने घ्यायला हवी. तो सर्वांना उत्तर देण्यास बांधिल आहे. जर भारतीय संघ ही मालिका हरला तर त्याला त्याचे शब्द बदलायला लागतील आणि संघावर वातावरणाचा वाईट परिणाम होतो हे मान्य करायला हवे, अशी जोरदार टीका भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगने रवी शास्त्रीवर केली आहे. 

लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या भारताच्या पराभवाची जबाबदारी प्रशिक्षकाने घ्यायला हवी. तो सर्वांना उत्तर देण्यास बांधिल आहे. जर भारतीय संघ ही मालिका हरला तर त्याला त्याचे शब्द बदलायला लागतील आणि संघावर वातावरणाचा वाईट परिणाम होतो हे मान्य करायला हवे, अशी जोरदार टीका भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगने रवी शास्त्रीवर केली आहे. 

लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला डावाने पराभव स्वीकारावा लागल्याने पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 अशा पिछाडीवर पडला आहे. अशातच हरभजनसिंगने लॉर्डसवर झालेल्या पराभवाचे जबाबदारी घेऊन त्याचे स्पष्टीकरण द्या असे म्हणत प्रशिक्षक रवी शास्त्रीवर टिका केली आहे. भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्रींवर सर्व स्तरातून टिका होत असतानाच भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगनेही रवी शास्त्रींवर कडक टीका होत आहे. 

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्रींनी भारतीय संघाला कोणाचीही भीती नाही, भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणारा सर्वोत्तम संघ आहे, असे मत व्यक्त केले होते. "आमच्यासाठी प्रत्येक सामना हा घरी खेळल्याप्रमाणेच असेल कारण प्रश्न संघाचा नाही तर खेळपट्टीचा आहे. आमच्याकडे 20 बळी घेऊ शकणारे गोलंदाज आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत खेळता येईल. फक्त आम्हाल सर्वोत्तम योजना आखणे गरजेचे आहे. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळू.'' असे मत शास्त्रींनी व्यक्त केले होते. यावर आता हरभजनसिंगने शास्त्रींनी संघाच्या अपयशाबद्दल बोलावे असे म्हटले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संपूर्ण धावांपैकी 54 टक्के धावा कोहलीने एकट्याने केल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाईल.

संबंधित बातम्या