आहेत एकाच दिवसाचे बर्थ डे बॉईज, प्रतिक्षा करताहेत वर्ल्डकप ट्रॉफीची

शैलेश नागवेकर
Tuesday, 5 February 2019

आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा.

आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि  ब्राझीलचा नेमार खरं सध्याच्या जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एकमेकांचे तडगे प्रतिस्पर्धी  पण सध्या तरी (दोन वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत असल्याने) त्यांची समोरा समोर गाठ पडलेली नाही. वर्ल्डकपमध्येही पोर्तुगाल- ब्राझील सामना झाला नाही त्यामुळे एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची संधी मिळाली नाही. तरीही या दोघांचा दरारा मात्र तगडा आहे. एकाच दिवशी वाढदिवस साजरा करताना मात्र मैत्रीचा असावा.

Age is Only a Number असे इंग्रजीत म्हटले जाते. साधारतः हा शब्दप्रयोग विद्यमान खेळाडूंबाबत केला जातो. रोनाल्डो आज ३४ तर नेमार २७ वर्षांचा झाला. वास्तविक पहाता नेमार रोनाल्डोच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतो, पण रोनाल्डो नेमारपेक्षा चार पावले पुढे आहे, म्हणूनच आजच्या दिवशी रोनाल्डोसाठी एज ईज ओन्ही नंबर्स असेच म्हणालयला हरकत नाही. या फुटबॉल विश्वात असंख्य खेळाडू आले आणि येत आहेत. पण ज्यांचे स्थान अढळ आहे त्यांची सुरुवात पेले, मॅराडोना आणि त्यानंतर ब्राझीलचा रोनाल्डो,  मेस्सी-ख्रिस्तियानो रोनाल्डोपर्यंत येते. 

दहा कोटी युरो
वयाच्या 34 व्या वर्षी ही हा कसलेला दणकट शरीरयष्टींचा अवलिया अजूनही काही वर्षे खेळणयाची धमक बाळगून आहे. किंबहूना नव्या तरुण खेळाडूंना आपल्या जवळही येऊ न देण्याचा करारीपणा बागळून आहे. रशियात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत स्पेनविरुद्ध त्याने फ्रिकीकवर केलेला गोल केवळ थक्कच करणारा होता. पण त्याच वर्ल्डकपमध्ये त्याचा संघ गाशा गुंडाळत असताना रोनाल्डो मात्र दहा कोटी युरोचा नवा करार करतो यावरून तो किती मोल्यवान आहे हे सिद्ध होते.   रोनार्डोच्या या  वयात झिनेदिन झिदान निवृत्त झाला होता, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोनाल्डोने गतवर्षी चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा कप जिंकले होते. यावरून रोनाल्डोची क्षमता आणि ताकद मोजमाप करण्याच्या पलिकडची आहे. 

बक्षिसांचा वर्षाव
2004-05 नंतर तो व्यावसाईक खेळाडू झाला त्यानंतर जागतिक स्तरावर त्याला अगणीतच पुरस्कार आणि सर्वोत्तम खेळाडूंच्या ट्रॉफी मिळाल्या आहेत त्यामध्ये पाच वेळा बॉलन डीऑर, पाच वेळा युरोपातील सर्वोत्तम खेळाडू, पाच चॅम्पियन्स लीग, तीन प्रीमियर लीग, दोनदा ला लीगा विजेतेपद अशी विजेतेपद कधी अगोदर मँचेस्टर युनायटेड आणि त्यानंतर रेयाल माद्रिकडून मिळवली आहेत. आता तो युव्हेंटसचे प्रतिनिधीत्व करत आहे.

नेमार आहे देमार पण..
ब्राझीलच्या खेळाडूंची शानच वेगळी असते त्यांची शैली तर आगळी वेगळी असतेच पण मैदानावरचा त्यांचा वावर भुरळ पाडणारा अलतो, अशा परंपरेतून पुढे येणाऱ्या नेमारचा सफाईदार खेळ नेत्रदिपक असतो. रोनाल्डोप्रमाणे अजून त्याचे शोकेस भरायचे आहे पण बँक बॅलन्स मात्र गले लठ्ठ झाली आहे. बार्सिलोनातून पीएसजीमध्ये जाताना 22 कोटी 20 लाख युरोंचा (दोन वर्षांपूर्वी) करार केल त्यावेळी तो सर्वाधिक होता. पण आज 27 वा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या क्लबला आणि देशाला काय मिळवून दिले याचा विचार करत असेल.

10 ते 10 क्रमांकाची जर्सी
बार्सिलोनातून 11 क्रमांकाच्या जर्सीत खेळताना त्याने मेस्सी आणि सॉरेस यांच्यासाथीत ला लीगा जिंकली पण पीएसजीत 10 क्रमांकाच्या जर्सीत तो मैदानापेक्षा मैदानाबाहेर दुखापतीमुळे  जास्त राहिला. पीएसजीला इटलीच्या क्लब फुटबॉलपेक्षा चॅम्पियन्स ट्रॉफीचे महत्व अधिक आहे म्हणून त्याला त्यांना बार्सिलोनातून आणले पण गतवर्षी बाद फेरी सुरु होण्यापूर्वी नेमार दुखापतग्रस्त झाला यंदाही तो दुखापतीमुळे उपउपांत्यपूर्व फेरी खेळू शकणार नाही. त्यामुळे नेमावर ऑफ फिल्ड बर्थडे साजरा करण्याची यंदा तरी वेळ आली आहे.

एकाच दिवशी वाढदिवस असलेले रोनाल्डो आणि नेमार यांच्यात या तारखेप्रमाणे इतरही साम्य आहे. नेमार आणि रोनाल्डो यांना अजूनही आपापल्या देशांसाठी वर्ल्डकप जिंकून देता आला नाही. गतवेळेस पोर्तुगालने युरोपियन चॅम्पियन्सशीप जिंकली, परंतु अंतिम सामन्यात सुरुवातीलाच रोनाल्डो जखमी झाला आणि सामन्याबाहेर गेला. २०१४ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतच नेमार जखमी झाला आणि ब्राझीलच्या आशांवर पाणी फेरले होते. 

तेव्हा...रोनाल्डो आणि नेमार यांना आजच्या वाढदिवशी तंदुरुस्तीच्याच अधिक शुभेच्छा !! सर सलामत तो पकडी पचास...तंदुरुस्ती मस्त तर  दराराही जबरदस्त.


​ ​

संबंधित बातम्या