माहीच्या वाढदिवसा निमित्त केदार म्हणतोय "के दिल अभी भरा नही"…

प्रीतम पुरोहित, क्रिडा
Tuesday, 7 July 2020

धोनी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शांत स्वभवाचा, हुशार, आक्रमक फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक. 2016 मध्ये धोनीच्या जीवनावर अधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनी म्हणतो ‘एक कप्तान ही टीम की तरह अच्छा होता है। आणि खरंच  आहे ते. !

पुणे : 9 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 ला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.  या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा 28 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याच माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल एम.एस धोनीचा आज 39 वा वाढदिवस आहे. धोनी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शांत स्वभवाचा, हुशार, आक्रमक फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक. 2016 मध्ये धोनीच्या जीवनावर अधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनी म्हणतो ‘एक कप्तान ही टीम की तरह अच्छा होता है। आणि खरंच  आहे ते. ! आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक खेळाडूंसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छां वर्षाव करत आहेत. अद्याप सुरूच आहे. असेच एक पत्र त्याच्या सहकारी केदार जाधवने मराठीमध्ये लिहून त्याला शुभेच्या दिल्या. केदार पत्राची सुरवात 'प्रिय माही भाई' अशी करतोय. क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत, तुम्ही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलेल्या पण खंबीरपणे उभे राहिलात…असं केदार जाधवने पत्रात म्हटलं आहे. त्याने हे पत्र आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माही भाई! माझ्या आणि अनेक फॅन्सच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. ” असं कॅप्शन टाकत केदारने पत्र शेअर केलं आहे.

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

केदार जाधवने लिहलेलं पत्र –

प्रिय माही भाई,
सुमद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की मला कायम तुमची आठवण येते. लाईटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं, दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं, तुमच्यासारखंच! तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीरपणे उभे राहिलात. लाईटहाऊस सारखंच!

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरवर्षी आपण एकमेकांना वाढदिवसाला सोबत असतो, यावेळी लॉकडाऊनमुळे साधी भेटही झाली नाही. मी टीव्हीवर जुन्या मॅचेस पाहताना माझी जर्नी रीकॉल करत होतो. आपल्या पार्टनरशिप्स, स्पम्पमागून तुम्ही दिलेल्या टिप्स, ऑफ द फिल्ड किस्से… सगळंच डोळ्यांसमोरुन जात होतं. तेव्हाच डोक्यात आलं की, तुमच्या येणाऱ्या बर्थडेला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावं. देशाला 2 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमद्ये पहिली पोझिशन मिळवून देणाऱ्या कॅप्टनला मी गिफ्ट म्हणून तरी काय देणार? काहीच सुचलं नाही तेव्हा डोक्यात आलं तुम्हाला पत्र लिहावं. माझ्यासकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे हे सांगावं…!

तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहण्यापासून सोबत खेळ्यापर्यंतचा प्रवास कदाचित नीटसा आठवणार नाही मला; पण एक प्रवास मात्र माझ्या मनावर कोरला गेलाय. 2017 मध्ये एका मॅचनंतर आपण ट्रॅव्हल करत


​ ​

संबंधित बातम्या