हैदराबाद ते ओव्हल : हनुमा विहारीची झेप

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्या ऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आणि त्यानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारताचा 292 वा कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. गेल्या 18 वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट खेळलेला तो आंध्र प्रदेशचा पहिला खेळाडू आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद हेसुद्धा आंध्र प्रदेशचे असून त्यांनी 2000 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्या ऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आणि त्यानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारताचा 292 वा कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. गेल्या 18 वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट खेळलेला तो आंध्र प्रदेशचा पहिला खेळाडू आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद हेसुद्धा आंध्र प्रदेशचे असून त्यांनी 2000 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 

भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना मुरली विजय आणि कुलदीप यादवच्या जागी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले. क्रीडा विश्वातील सध्या खेळणाऱ्या सर्व फलंदाजांपैकी विहारीची प्रथम श्रेणीतील धावांची सरासरी सर्वाधिक म्हणजेच 59.45 आहे. त्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा दुसरा क्रमांक लागतो. त्याची सरासरी 57.27 आहे. 

Hanuma Vihari

19 वर्षांखालील विश्वकरंडक

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये  झालेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडकात विजय मिळवलेल्या भारतीय संघात विहारी सहभागी होता. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या आदल्या दिवशी मनन व्होराचा अंगठ्याला दुखापत झालेल्या विहारीला संघात स्थान देण्यात आले. मात्र त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने सहा सामन्यात फक्त 71 धावा केल्या. 

प्रथम श्रेणी क्रिकेट

त्याने वयाच्या 17व्या वर्षी हैदराबादकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र तो 2016-17 मध्ये आंध्रप्रदेशकडून खेळला आणि त्याच्या याच निर्णयाने त्याच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. त्यावर्षी त्याने 15 डावांमध्ये 688 धावा केल्या. तर 2017-18 मध्ये त्याने अवघ्या सहा सामन्यांमध्ये 94च्या सरासरीने 752 धावा केल्या. यामध्ये त्याने ओडिशाविरुद्ध आपले पहिले त्रिशतक झळकावले होते. 

विहारीचे वेगळेपण

कसोटी क्रिकेटमध्ये झटपट जास्त धावा करण्यापेभा मैदानावर जास्त काळ टिकून राहणे महत्त्वाचे असते आणि विहारीकडे नेमका हाच गुण आहे. विहारी हा बॅक फूटवर खेळाणार फलंदाज आहे आणि यामुळेच तो सध्याच्या भारतीय संघातील फलंदाजांपेक्षा वेगळा आहे. 

IPLचा अनुभव

विहारीने आयपीएलमध्ये आजवर फक्त 22 सामने खेळले आहेत. तसेच त्याने 2015 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून शेवटचा सामना खेळला होता.  


​ ​

संबंधित बातम्या