नवमहाराष्ट्र, खडकी ब्लूज संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

नवमहाराष्ट्र, खडकी ब्लूज संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे : गुरू तेग बहादूर स्पोर्टस फाउंडेशन आयोजित अठराव्या वरिष्ठ गटाच्या गुरू तेग बहादूर करंडक फुटबॉल स्पर्धेत द्वितीय व तृतीय श्रेणी गटात नवमहाराष्ट्र, खडकी ब्लूज क्‍लब या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठली. 

शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नवमहाराष्ट्र क्‍लबने स्ट्रायकर्स क्‍लबवर टायब्रेकरमध्ये 3-1 असा विजय मिळविला. या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. परंतु निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. त्यात नवमहाराष्ट्र क्‍लबकडून जितेश परदेशी व आमोल वागसकर वगळता सन्मित गायकवाड, दीपक साखरे, दिलीप रॉय यांनी गोल नोंदविले, तर स्ट्रायकर्सकडून दिनेश सातकरलाच गोल नोंदविता आला त्यांचे सुबोध लामा, रोहित लोखंडे व प्रतीक मोरे गोल करण्यात अपयशी ठरले. 

दुसऱ्या लढतीत खडकी ब्लूज क्‍लबने ब्लू स्टॅग क्‍लबवर टायब्रेकमध्ये 4-3 असा विजय मिळविला. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने, टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. त्यात खडकी ब्लूजकडून मायकेल डिक्रूझ वगळता ऍण्ड्रयू स्वामी, विशाल वाघमारे, साजिद शेख, वाजीद शेख यांनी गोल नोंदविले, तर ब्लू स्टॅगकडून अजित जाधव, अंकुश कुमार, रोहन आखाडे हे तिघेच गोल नोंदवू शकले. विवेक मारसकोले व वैभव सावंत गोल करण्यात अपयशी ठरले. 

फिनआयक्‍यू जीओजी क्‍लबने एनवायएफए संघावर 4-1 असा विजय मिळविला. या वेळी विजयी संघाकडून भुनेश पिल्लेने प्रकाश थापा व प्रकाश थोरातच्या पासवर (15 व 37 वे मिनीट) दोन तर आदर्श कोनेलू (24 वे मिनीट) व प्रकाश थोरातने (49 वे मिनीट) अनुक्रमे सुरज थापा व श्रीकांत मोलनगिरीने दिलेल्या पासवर प्रत्येकी एक गोल केला. तर एनवायएफए संघाकडून एकमेव गोल जी. कपिलने विकी राजपुतच्या पासवर 61 व्या मिनिटास केला. 

​ ​

संबंधित बातम्या