Pro Kabaddi 2019 : कामगिरी सुधारण्यावर गुजरात लक्ष देणार

सागर शिंगटे
Wednesday, 11 September 2019

"प्रो-कबडुी लीग मधील आगामी सामन्यांसाठी आम्ही रणनिती आखत आहोत. आत्तापर्यंत च्या सामन्यांत चढाई आणि बचावात त्रुटी राहिल्या. परंतु, पुढील लढतीसाठी एकदिलाने सर्वोत्तम सांघिक कामगिरी करण्यावर आमचा पूर्ण भर राहिल. "

पिंपरी-चिंचवड :"प्रो-कबडुी लीग मधील आगामी सामन्यांसाठी आम्ही रणनिती आखत आहोत. आत्तापर्यंत च्या सामन्यांत चढाई आणि बचावात त्रुटी राहिल्या. परंतु, पुढील लढतीसाठी एकदिलाने सर्वोत्तम सांघिक कामगिरी करण्यावर आमचा पूर्ण भर राहिल. ", असे गुजरात फॉर्च्यून जायंट्स चा कर्णधार सुनील कुमार मलिक याने स्पष्ट केले. 

प्रो-कबडुी लीग मधील गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाने आगामी सामन्यांची पूर्व तयारी म्हणून निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेत  बुधवारी सुमारे तीन तास कसून सराव केला. त्यावेळी, त्याने वरील निर्धार व्यक्त केला. 

सुनील कुमार म्हणाला, " आमच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमी नाही. मात्र, छोट्या चुका होत आहेत. पुढील उर्वरित आठही सामने आमच्या साठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे, संपूर्ण संघाच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. एकदिलाने सांघिक खेळ केल्यास आम्ही नक्कीच अंतिम फेरीपर्यंत जाऊ."

संघ प्रशिक्षक नील गुलिया म्हणाले, "चालू हंगामात संघाची आशादायक कामगिरी झाली नाही. १४ पैकी ८ सामन्यांत आम्हाला हार पत्करावी लागली. ५ सामने जिंकले. तर १ सामना बरोबरीत सुटला. लीग मधील सर्व प्रतिस्पर्धी संघ चांगले आहेत. त्यांच्या विरोधात फार कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. संघात युवा खेळाडू अधिक असल्याने त्यांच्या वर खेळताना दडपण येते. मात्र, पुढील सामन्यांत आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू."


​ ​

संबंधित बातम्या