सरकारचे मोठे पाऊल, ऑलम्पिक पात्र खेळाडूंना तयारीसाठी 50 लाख 

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना तयारीसाठी 50 लाख देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना व मार्गदर्शकांना रोख पारितोषिक वितरण सोहळा आज बालेवाडीत पार पडला.

मुंबई - ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना तयारीसाठी 50 लाख देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना व मार्गदर्शकांना रोख पारितोषिक वितरण सोहळा आज बालेवाडीत पार पडला. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक कल्याण संचनालयातर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येते. यावर्षी 24 खेळाडूू आणि16 प्रशिकांचा सन्मान करून एकूण 91 लाख रुपयांचा बक्षिसे त्यांना देण्यात आली. 

ऑलिंपिकमध्ये पदके मिळवू शकतील अशा खेळाडूंना केंद्र सरकारची टॉप्स (टार्गेट टू पोडियम) योजना आहे त्यासाठी खेळाडू निवडून त्यांच्यावर अधिक मेहनत घेतली जाते त्यांना प्रशिक्षणासाठी निधीही दिला जातो. महाराष्ट्र सरकारनेही ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना तयारीसाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. 

ऑलिंपिकमध्ये पद मिळवल्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो, परंतु हाच निधी जर तयारीसाठी मिळाला तर अधिक चांगली कामगिरी करता येईल असे खेळाडूंकडून नेहमीच सांगितले

संबंधित बातम्या