हॉकीला हिरवा कंदील ; तर `या` खेळाला विरोध 

संजय घारपुरे
Saturday, 1 August 2020

भारतीय क्रीडा प्राधिकरण शिबिरांचा निर्णय घेताना प्रत्येक खेळानुसार भिन्न निकष लावत असल्याची तक्रार होण्यास सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण शिबिरांचा निर्णय घेताना प्रत्येक खेळानुसार भिन्न निकष लावत असल्याची तक्रार होण्यास सुरुवात झाली आहे. हॉकीच्या शिबिरास मंजुरी देताना ऍथलेटिक्‍ससाठी केवळ ऑलिंपिक पात्र खेळाडूंनाच परवानगी दिली आहे. 

यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने गेल्या आठवड्यात आशियाई स्पर्धा, आशियाई रिले स्पर्धा, जागतिक रिले, आशियाई तसेच राष्ट्रकुल ऍथलेटिक्‍स तसेच ऑलिंपिकसाठी पूर्वतयारीसाठी विविध ठिकाणी सराव शिबिर घेण्याची परवानगी मागितली. त्यासाठी पतियाळा, तिरुवअनंतपूरम, बंगळूरु आणि पी. टी. उषा स्कूलचा प्रस्ताव दिला. या ठिकाणी 140 ऍथलिटस्‌ आणि 30 मार्गदर्शक असतील, असे सांगितले. मात्र क्रीडा प्राधिकरणाने बंगळूर आणि पतियाळात सुरू असलेलेच शिबिर सुरू राहील, हे स्पष्ट केले. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

हॉकी इंडियाने पुरुषांच्या शिबिरासाठी 33 खेळाडू आणि 8 सपोर्ट स्टाफची, तर महिलांच्या शिबिरासाठी 24 खेळाडू आणि सात सपोर्ट स्टाफची निवड केली. त्या सर्वांना मंजुरी देतानाच सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला एअर इंडियाचे तिकीट आरक्षित करण्यास सांगितले आहे. त्यांना प्रवासाचा विस्तृत कार्यक्रम कळवण्याचीही सूचना आहे. बंगळूरुला आल्यावर प्रत्येकाची चाचणी होईल आणि त्यांना 14 दिवस विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल. शिबिरात असताना बाहेरून खाद्यपदार्थ तसेच काहीही मागवण्यास मनाई करण्यात आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या