धनश्री म्हणतेय; मी स्वर्गात असल्याचा फिल घेतीये!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 27 February 2021

यावर तिच्या फॅन फॉलोवर्सची प्रंचड संख्या दिसून येते. तिच्या प्रत्येक व्हिडिओला आणि सोशल मीडियावर ती शेअर करत असलेल्या फोटोला चांगली पसंती मिळताना दिसते. 

Dhanshree Varma Viral Video : भारतीय क्रिकेट वर्तुळातील फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडिया चांगलीच सक्रिय आहे. युजीची पत्नी या ओळखीशिवाय तिचा स्वत:चा मोठा चाहता वर्ग तिने निर्माण केलाय. वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या धनश्रीचे एक स्वतंत्र युट्यूब चॅनेल आहे. यावर तिच्या फॅन फॉलोवर्सची प्रंचड संख्या दिसून येते. तिच्या प्रत्येक व्हिडिओला आणि सोशल मीडियावर ती शेअर करत असलेल्या फोटोला चांगली पसंती मिळताना दिसते. 

कोण होती प्रियांका झा? MS धोनीची रिअल लव्हस्टोरी

सध्याच्या घडीला धनश्री वर्माचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चत आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियसोबत नाही. त्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत क्वॉलिटी टाईम व्यतित करतोय. हे स्विट कपल मालदीवमध्ये आहे. या ठिकाणचा एक व्हिडिओ धनश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. यात ती स्विमिंग सूटमध्ये दिसते. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेक लोक व्हिडिओला पसंती देत आहेत. 

यापूर्वी धनश्री पंजाबी सिंगर जस्सी गिलसोबत एका गाण्याच्या शुटींगच्या व्हिडिओमध्ये दिसली होती. त्यानंतर धनश्रीने सोशल मीडियाच्या माधअयमातून आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये धनश्री गुलाबी रंगाच्या स्विमिंग सूटमध्ये दिसते. स्वर्गात असल्याचे फिल घेत क्वॉलिटी वेळ घालवत असल्याचा उल्लेख तिने पोस्टमध्ये केला आहे.  5 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून अनेक जण यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काहींनी हॉट तर काहींनी सुंदरी अशी टिप्पणी व्हिडिओ पाहून केलीय.  


​ ​

संबंधित बातम्या