सासू-सुनेच्या लोकप्रिय गाण्यावर 'युजी-धन्नो'ची धम्माल मस्ती

सुशांत जाधव
Thursday, 3 September 2020

 'रसोड़े में कौन था' याची सध्याच्या घडीला सोशल मीडियावर  जोरदार चर्चा सुरु आहे.  तुफान व्हायरल झाल्यानंतर निर्मात्याने या सीरियलचा दुसरा सीझन काढण्याची घोषणा केली होती. याचा टीझर व्हिडिओ देखील समोर आला आहे.

जगभरातील सर्वात लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीगसाठी भारतासह अन्य देशातील खेळाडू सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्यात वर्षांतील स्पर्धा युएईच्या मैदानात रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शिवाय अन्य खेळाडू आपल्या कुटुंबियांशिवायच युएईला रवाना झाले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा युजवेंद्र चहलने आयपीएलसाठी सज्ज होण्यापूर्वी आयुष्यभरासाठी जोडीदार निवडण्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे विशेष नियमावली नसती तर चहल आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत दिसला असता. प्रॅक्टिकलीदृष्ट्या हे शक्य नसले तरी सदा सर्वादा ती आपल्यासोबत असल्याचे चहल व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.  चहलने नुकताच आपल्या होणारी पत्नी धनश्री वर्मासोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओमध्ये हे कपल धम्माल मस्ती करताना पाहायला मिळते. या व्हिडिओत चहल  'साथ निभाना साथिया' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील  'रसोड़े में कौन था' यावर डान्स करताना पाहायला मिळते. त्याच्यासोबत धनश्रीही थिरकताना दिसते. दोघांचा अनोखा अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक लोक धम्माल व्हिडिओला लाइक करत असून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देताना दिसते. 

चहलच्या 'लाइफ पार्टनर'चा चक्क PPE किटमध्ये डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

 'रसोड़े में कौन था' याची सध्याच्या घडीला सोशल मीडियावर  जोरदार चर्चा सुरु आहे.  तुफान व्हायरल झाल्यानंतर निर्मात्याने या सीरियलचा दुसरा सीझन काढण्याची घोषणा केली होती. याचा टीझर व्हिडिओ देखील समोर आला आहे.  चहलविषयी बोलायचे तर त्याने मागच्या महिन्यातच धनश्री वर्माची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले होते. धनश्रीसोबत रोका सेरेमनीचे काही फोटो चहलने शेअर केले होते. आयपीएल 2020 मध्ये चहल भारतीय संघाचा कर्णधार नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मैदानात उतरणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या