युजीनं धनश्रीसोबत शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी एबीची घेतली फिरकी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 20 October 2020

"ये रही मेरी खूबसूरत शाम।" या कॅप्शनसह युजीनं एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोवरुन नेटकरी एबी डिव्हिलियर्सला ट्रोल करताना दिसत आहे. हा फोटो एबीनंच काढलाय का? अशा कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळत आहेत.

युएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन् प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चांगल्या रिदममध्ये (लयीत) दिसत आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल या संघाचा नियमित सदस्य आहे. इतर गोलंदाजांच्या तुलनेत स्पर्धतील कामगिरीपेक्षा चहल आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत आहे. युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन एक फोटो शेअर केली आहे. त्याने आपल्या भावी पत्नी धनश्री वर्मासोपतचा एक फोटो शेअर केला आहे.  

CSKvsRR : फोटोंच्या खजिन्यातून; सामन्यातील खास क्षण एका क्लिकवर

"ये रही मेरी खूबसूरत शाम।" या कॅप्शनसह युजीनं एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोवरुन नेटकरी एबी डिव्हिलियर्सला ट्रोल करताना दिसत आहे. हा फोटो एबीनंच काढलाय का? अशा कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळत आहेत.  काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यावेळी या लोकप्रिय कपलने फोटो क्रेडिटमध्ये एबीच्या नावाचा उल्लेख केला होता. यामुळेच आरसीबीच्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने धनश्रीसोबत शेअर केलेल्या फोटोवर एबीला ट्रोल करण्यात येत आहे.  

yuzvendra chahal with dhanashree

काही दिवसांपूर्वीच युजवेंद्र चहलला भेटण्यासाठी युईमध्ये आलेली धनश्रीने वैद्यकिय शिक्षण घेतले आहे. युट्यूबरवर बॉलिवूड गाण्यांचे रिक्रिएट करुन तिने सोशल मीडियावर आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्या डान्स व्हिडिओ चांगलेच लोकप्रिय असून तिची स्वत:ची डान्स प्रशिक्षण देणारी कंपनी देखील आहे.  युजवेंद्र चहल आणि धनश्री 8 ऑगस्टला एकमेकांना पसंत केल्याची घोषणा केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या