युजीचं 'प्रेम' म्हणाले; AB सोबतचा फोटो करणार 'फ्रेम'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

धनश्रीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या फोटोसोबत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलंय की, एबीसोबतचा हा फोटो माझ्यासाठी खास क्षणाची अनुभूती देणारा आहे.

क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सामने प्रत्यक्षात पाहण्यासाठी दुबईला रवाना झाली. यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दमदार कामगिरी करेल, असे चित्र दिसत असताना त्यांची गणिते बिघडली. कसेबसे प्लेऑफमध्ये पोहचलेल्या बंगळुरुच्या संघाला सनरायझर्स हैदराबादने आउट केले.

India Tour of Australia 2020 : ऑस्ट्रेलियाने आखलाय ‘कोव्हिडमुक्त’ प्लान

दुबईच्या मैदानात होणाऱ्या स्पर्धेत पतीचा संघ जिंकण्याचा क्षण पाहण्याचा योग धनश्रीला लाभला नसला तरी तिला दिग्गजांच्या सानिध्यात कॉलिट टाइम स्पेंड करण्याचं भाग्य लाभलं. सोशल मीडियावरील आपल्या प्रतिक्रियातून ती यासंदर्भात आपल्या मनातील भावना बोलून दाखवताना दिसते. विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनला उपस्थितीत राहणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती असे सांगणाऱ्या धनश्रीनं आता बंगळुरु संघातील एबी डिव्हिलियर्ससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

 IPL2020 : प्ले ऑफमध्ये हिटमॅनचा फ्लॉपशो कायम; नावे झाली नकोशा विक्रमाची नोंद

धनश्रीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या फोटोसोबत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलंय की, एबीसोबतचा हा फोटो माझ्यासाठी खास क्षणाची अनुभूती देणारा आहे. हा फोटो मी फ्रेम करुन कायम स्मरणात ठेवेन. तिने एबीच्या पहिल्या भेटीचा किस्साही शेअर केला आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा दिग्गज क्रिकेटला भेटले होते त्यावेळी मी थरथर कापत होते. त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, असा उल्लेखही धनश्रीने पोस्टमध्ये केलाय.  या पोस्टमध्ये युजीला टॅग करत तिने पुढे लिहिलंय की, युजवेंद्र तू कमावलेल्या रिसपेक्टचा मला अभिमान वाटतो. आरसीबीसोबतचा प्रवास आनंददायी होता. मी यासाठी सर्वांची आभारी राहिन.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Going to frame this and cherish it for a lifetime. @abdevilliers17 thank you for being the nicest person on this trip. I am extremely blessed to be around such legends. I still remember the first time I got introduced to you, the shivers and butterflies I felt was to the topmost level and to the countless number of nights sitting together and getting to learn so much from you. @yuzi_chahal23 I’m so proud of what you do and the respect you’ve earned around such legends Thank you for the greatest opportunities you’ve given me. Words aren’t truly enough to express my journey with RCB. Posting this picture but taking back amazing memories with me. Thank you god. I will always be grateful

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on


​ ​

संबंधित बातम्या