हनीमूनला गेलेल्या युजी-धनश्री कपलला जेव्हा धोनी भेटतो...

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

ही जोडी आता हनीमूनसाठी परदेशात पोहचली आहे. ज्याठिकाणी नव कपल आपला क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी गेले आहे त्याच ठिकाणी या कपलने क्लॉलिटी पर्सनची झालेली सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला. ही जोडी आता हनीमूनसाठी परदेशात पोहचली आहे. ज्याठिकाणी नव कपल आपला क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी गेले आहे त्याच ठिकाणी या कपलने क्लॉलिटी पर्सनची झालेली सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

फिरकीपटू मर्यादीत षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मालिकेनंतर मायदेशी परतल्यावर पत्नी धनश्रीसोबत दुबईला हनीमूनसाठी दुबईला पोहचला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा देखील पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह दुबईतच आहे. कधीकाळी मैदानात एकमेकांना भेटणाऱ्या धोनी-चहलच्या फॅमिली भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.   

युजवेंद्र चहल आणि धनश्री हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. या दोघांनी क्लॉलिटी पर्सनसोबतच्या भेटीचे खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.  दोन महिन्यांपूर्वी एमएस धोनी आणि युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसले होते. संघासोबत युएई दौऱ्यावरुन मायदेशी परतल्यानंतर आता दोघेही फॅमिली टूरला दुबईमध्ये आहेत.  

युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेतल्यावरही कोरिओग्राफरचा छंद जोपासणाऱ्या धनश्रीसोबत विवाह केला होता. ऑगस्टमध्ये युजी आणि धनश्री यांचा साखरपुडा झाला होता. आयपीएलच्या दरम्यान धनश्री युजीला भेटण्यासाठी दुबईला आली होती. यावेळी विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावरुन शेअर केले होते.   


​ ​

संबंधित बातम्या