धनश्री- -युजवेंद्रचा हटके डान्स तुम्ही पाहिलात का?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

युजवेंद्रसह धनश्रीचा एक स्वत:चा वेगळा फॅन फॉलोवर्स वर्ग आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसते.

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरियोग्राफर धनश्री वर्माने 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चाहत्यांना आणि देशवासियांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हे स्वीट कपल  'रंग दे बसंती'  गाण्यावर डान्स करताना दिसते. दोघांनी वेगवेगळा डान्स करुन एकत्रित एडिट करण्यात आला आहे.  

युजवेंद्रसह धनश्रीचा एक स्वत:चा वेगळा फॅन फॉलोवर्स वर्ग आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसते. आपल्या महान देशाला हजारो सलाम. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! असा संदेशही युजवेंद्र चहलने दिला आहे. 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्येही धनश्री युजीसोबतच होती. विराट कोहलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनीसोबतचे या जोडीचे फोटो व्हायरल झाले होते.  


​ ​

संबंधित बातम्या