'किमची रिमझिम' युवीच्या लूकवर फिदा; सोशल मीडियावर झाला हशा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

क्रिकेट युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा यांच्यात 4 वर्षे अफेयर सुरु होते. पण

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये युवीने आपल्या रक्तात अजूनही क्रिकेटचे रक्त उसळ्या मारत असल्याचे दाखवून दिले होते. या स्पर्धेत दमदार कामगिरी करुन त्याने मालिकावीर होण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला होता. युवी या सीरीजमध्ये लांब आणि स्टाईलिश केशरचनेसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. 

प्रसिद्ध हेयर स्टाइलिस्ट आलिम हकीम याने युवीच्या लूकवर मेहनत घेतली आहे. युवीने त्याच्या इन्टाग्राम अकाउंटवरुन नव्या लूकमधील फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना नवा लूक कसा वाटतो? असा प्रश्नही युवीने आपल्या चाहत्यांना विचारलाय. यावर बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांतर युवीच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. युवी आणि किम शर्मा यांच्यात डेटिंग सुरु असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. पण युवीने फायनली हेजल कीचसोबत विवाह केला. यासंदर्भामुळेच किमीला नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत.  

...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

युवीचं किमसोबत होतं अफेयर

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या 'मोहब्बतें' या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी किम शर्मा आणि युवराज सिंग यांच्या अफेयर होते. तिने 'तुम से अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'कहता है दिल बार-बार' आणि 'जिंदगी रॉक्स' यासारख्या चित्रपटात काम केले आहे. पण ती आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. पतीपासून विभक्त झालेल्या किमचे युवराजसोबत प्रेमसंबंध फुलले होते.  2003 पासून सुरु झालेल्या प्रेम कहाणीला 2007 मध्ये ब्रेक लागला होता. नात्यात अंडस्टॅडिंग नसल्याची कबुली युवीने एका मुलाखतीमध्ये दिली होती.  


​ ​

संबंधित बातम्या