क्रिकेटमधली अशी 'बाप' माणसं; ज्यांना परीच्या पावलांनी मिळाली गुडन्यूज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

पहिली गूडन्यूज परीच्या रुपात मिळणारा विराट पहिला क्रिकेटर नाही. त्याच्यापूर्वी काही महिने अगोदरच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमनलाही कन्यारत्नच झाले होते. जाणून घेऊयात अशा क्रिकेटपटूंबाबत ज्यांना पहिल्या अपत्याच्या स्वरुपात मुलगी झाली अशा बाप माणसांबद्दल..... 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला 11 जानेवारीला कन्यारत्न झाले. या दोघांवर बॉलिवूडसह क्रिकेट जगतातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पहिली गूडन्यूज परीच्या रुपात मिळणारा विराट पहिला क्रिकेटर नाही. त्याच्यापूर्वी काही महिने अगोदरच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमनलाही कन्यारत्नच झाले होते. जाणून घेऊयात अशा क्रिकेटपटूंबाबत ज्यांना पहिल्या अपत्याच्या स्वरुपात मुलगी झाली अशा बाप माणसांबद्दल..... 

क्रिकेटमध्ये ज्याला देवाची उपमा दिली जाते त्या सचिन तेंडुलकरलाही पहिली मुलगीच आहे.  सचिनची मुलगी सारा हिचा 12 ऑक्टोबर 1997 ला जन्म झाला होता, सचिन-अंजली यांना सारा आणि अर्जुन अशी  दोन मुलं आहे. सचिनप्रमाणे सारा आणि अर्जुन या दोघांचेही लाखोंच्या घरात चाहते आहेत. भारतीय क्रिकेटमधील दादा अर्थात बीसीसीयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरीही पहिल्यांदा मुलीचा जन्म झाला होता. 3 नोव्हेंबर 2001 रोजी डोना गांगुली यांनी एका मुलीला जन्म दिला होता. 1 फेब्रुवारी 1997 रोजी डोना-सौरव यांचा प्रेम विवाह झाला होता. या जोडीचा प्रेमाचा किस्सा अफलातून असाच आहे.  

देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी देखील एका मुलीचा पिता आहे. धोनीची मुलगी झिवाचा जन्म 2015 च्या वर्ल्डकप दरम्यान झाला होता. चिमुकल्या झिव्हा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. क्रिकेटर्ससोबतचे तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. हिटमॅन रोहित शर्माचं पहिलं अपत्य मुलगीच आहे. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या मुलीचे नाव आहे समायरा असं आहे. तिचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. रोहित सोबत समायराचे फोटो चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळाले आहे.

जगातील दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारालाही एक मुलगी आहे. त्याने आपल्या मुलीचे नाव सिडनी ठेवले. ब्रायन लाराने 1993 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे कसोटी कारकीर्दीतलं पहिलं शतक केले होते. त्यामुळे त्याने आपल्या मुलीचे नाव सिडनी ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक रिकी पॉन्टिंगलाही पहिलं अपत्य मुलगीच आहे.   त्याची पत्नी रियानाने 2008 मध्ये  एमी चार्लोटला जन्म दिला होता. सध्या रिकी पाँटिंग आणि रियाना यांना तीन अपत्य आहेत.  भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग हा देखील एका मुलीचा पिता आहे. भज्जी आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी आपल्या मुलीचे नाव हिनाया हीर ठेवले आहे.  

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना यालाही ग्रासिया नावाची पहिली मुलगी झाली. तसेच गौतम गंभीर 2 मुलींचा पिता आहे. तसेच सध्याचा टीम इंडियाचा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेलाही गेल्या वर्षी मुलगीच झाली. तिचे नाव आर्या असे आहे.  भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव (अमिया), माजी स्फोटक फलंदाज नवज्योत सिंह सिद्धू (रबिया), टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (अलेका), ऑल राउंडर रविंद्र जडेजा (निध्याना) आणि फिरकीपटू आर.अश्विन (आध्या आणि अखिरा) यांच्या घरी पहिलं अपत्य मुलगीच जन्मली. 

दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि ज्याच्या फिल्डिंगचे चाहते आहेत त्या जाँटी ऱ्होड्स (इंडिया) आणि स्फोटक फलंदाज मिस्टर 360 एबी डिव्हिलिअर्स (ताज), तसेच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन यांनाही पहिली मुलगीच झाली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या