पाकिस्तानच्या 'विराट कोहली'वर लैंगिक शोषणाचे आरोप; लग्नाचं वचन देऊन दिला धोका

सकाळ ऑनलाईन
Sunday, 29 November 2020

महिलेने पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेपासूनच दोघांमध्ये मैत्री होती. 2010 मध्ये बाबर आझमनं तिला लग्नाचे वचन दिले होते. नात्यातील संबंधाविषयी कुटुंबियांना माहिती दिली. त्यांचा विरोध असल्यामुळे आम्ही घर सोडले, असे सांगताना महिलने बाबरने पळवून नेले असा उल्लेख केलाय. 2012 मध्ये बाबरने 19 वर्षांखालील पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले. यानंतर प्रसिद्धी झोतात आल्यानंतर बाबरची पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. त्यानंतर त्याने मन बदलले, असा दावा महिलेनं केला आहे. 

पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमवर एका महिलेनं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे शारीरिक शोषण केले, असे संबंधित महिलेने म्हटले आहे. शनिवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महिलेने आझमवर गंभीर आरोप केले. बाबरच्या कठिण परिस्थितीत साथ दिली. त्याला आर्थिक साह्य देखील केल्याचा दावा महिलेने केलाय.

पाकिस्तानचा हा क्रिकेटर विराट कोहलीला फॉलो करतो. त्याच्यासारखी कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे त्याने अनेकदा म्हटले आहे. पाकिस्तानचा तो विराट कोहली आहे, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. 

AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

महिलेने पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेपासूनच दोघांमध्ये मैत्री होती. 2010 मध्ये बाबर आझमनं तिला लग्नाचे वचन दिले होते. नात्यातील संबंधाविषयी कुटुंबियांना माहिती दिली. त्यांचा विरोध असल्यामुळे आम्ही घर सोडले, असे सांगताना महिलने बाबरने पळवून नेले असा उल्लेख केलाय. 2012 मध्ये बाबरने 19 वर्षांखालील पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले. यानंतर प्रसिद्धी झोतात आल्यानंतर बाबरची पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. त्यानंतर त्याने मन बदलले, असा दावा महिलेनं केला आहे. 

सध्याच्या घडीला बाबर आझम टी-20 आणि कसोटी मालिकेसाठीच्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस अन्यथा जीवे मारेन, अशी धमकी बाबरने दिली होती. एवढेच नाही तर त्याने मारहाण देखील केली, असा आरोपही महिलेनं केलाय. या गंभीर आरोपानंतर पाकिस्तानी बोर्ड काय कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

​ ​

संबंधित बातम्या