कोरोनाग्रस्त ट्रम्प दाम्पत्याला सेहवाग बाबांचा आशीर्वाद!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 October 2020

ट्रम्प दाम्पत्याने लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना मोदींनी केली. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्ट चांगलीच चर्चेत आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendera Modi) यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची विचारपूस केली.  

ट्रम्प दाम्पत्याने लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना मोदींनी केली. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्ट चांगलीच चर्चेत आले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांना उद्देशून सेहवागने एक पोस्ट शेअर केली आहे. साधू वेषातील फोटोसह त्याने या पोस्टला लक्षवेधी कॅप्शन दिल्याचे दिसते.  ‘ ट्रम्प यांनी कोविड 19 वर मात करावी यासाठी बाबा सेहवागचा आशीर्वाद, असे मजेशीर कॅप्शनवाला फोटो त्याने शेअर केला.  गो कोरोना गो कोरोना गो (Go Corona Go Corona Go) असा उल्लेखही सेहवागने आपल्या पोस्टमध्ये केलाय.   

​ ​

संबंधित बातम्या