धनश्रीनं शेअर केला 'विराट' बर्थडे सेलिब्रेशनचा फोटा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची गर्लफ्रेंड धनश्री वर्माने  (Dhanashree Verma) ने सोशल मीडिया विराट कोहलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये विराटसह अनुष्का शर्मा आणि युजवेंद्र चहल देखील दिसतात. विराट कोहलीचे व्यक्तिमत्व हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत यापुढेही यशाचा प्रवास सुरु ठेवा, अशा शब्दात धनश्रीनं विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Virat Kohli: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Birthday) सध्याच्या घडीला युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करताना दिसत आहे. प्ले ऑफमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळण्यापूर्वी विराटचा 32 वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहेत. क्रिकेट क्षेत्रासह अन्य क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसतोय.

क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची गर्लफ्रेंड धनश्री वर्माने  (Dhanashree Verma) ने सोशल मीडिया विराट कोहलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये विराटसह अनुष्का शर्मा आणि युजवेंद्र चहल देखील दिसतात. विराट कोहलीचे व्यक्तिमत्व हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत यापुढेही यशाचा प्रवास सुरु ठेवा, अशा शब्दात धनश्रीनं विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी युजवेंद्र चहल आणि त्याची होणारी पत्नी धनश्री वर्माही उपस्थितीत होती. 

विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आयपीएल 2020 च्या प्लेऑफमध्ये पोहचला आहे. हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकून संघातील सहकारी कोहलीला 'विराट' गिफ्ट देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराटच्या नेतृत्वाखालील  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) एलिमिनेटरमधील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. 6 नोव्हेंबरला हा सामना खेळवण्यात येणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या