क्षणात डोळ्यात पाणी येते अन् ..; अनुष्कानं लेकीच्या नावासह शेअर केला पहिला फोटो

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 1 February 2021

अनुष्का शर्माने (Anushka Sharma Twitter) ट्विटरवर लिहिलंय की, आम्ही आमचे आयुष्य खूप आनंदात जगत आहोत.

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना या महिन्यातच कन्यारत्न झाले. स्वीट कपलची लेक कशी दिसते? तिच नाव काय ठेवावे यासंदर्भात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेत्रीने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. तिने आपल्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. याशिवाय लेकीच नावही तिने सांगितले आहे.  

अनुष्का शर्माने सोशल मीडियातून शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या मुलीली हातात घेऊन खेळवताना दिसते. फोटोमध्ये विराट कोहलीही दिसतो. विराट-अनुष्काने आपल्या लेकीच नाव  वामिका (Vamika) असे ठेवले आहे. अनुष्काने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतात. 

अनुष्का शर्माने (Anushka Sharma Twitter) ट्विटरवर लिहिलंय की, आम्ही आमचे आयुष्य खूप आनंदात जगत आहोत. वामिका आल्याने आमच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. कधीकधी अश्रू, हास्य, चिंता आणि आनंद एका क्षणात अनुभवते, असेही अनुष्काने आपल्या पोष्टमध्ये लिहिले आहे. चाहत्यांचे विशेष आभार मानायलाही ती विसरलेली नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या