Valentine Week Special : रितिका नव्हे तर हे आहे रोहितचं पहिलं प्रेम

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

"इसकी तरफ देखना भी मत... बहन है मेरी"  

क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रेटिंच्या प्रेमाची चर्चा नेहमीच रंगत असते. अनेक क्रिकेटपटूंची नावही अभिनेत्रींशी जोडली गेली. काहींनी त्यांच्यासोबत विवाह देखील थाटला. यापासून रोहित शर्मा थोडा दूरच राहिला असला तरी, लग्न गाठ बांधण्यापूर्वी त्यानं ही लव्ह मॅरेजची निवड केली. रितिका आणि रोहित यांच्या प्रेमाची कहाणी अजब गजब अशीच आहे. फार कमी लोकांना त्यांच्या प्रेमाच्या खेळामागची कहाणी माहित असेल. 

सध्याच्या घडीला आघाडीच्या क्रिकेटर्समध्ये असलेला रोहित त्यावेळी नुकताच प्रकाशझोतात आला आणि त्याला पहिलं प्रेम भेटलं. रितिका त्याची प्रेयसी आणि आज पत्नी असली तरी, त्याचं पहिल प्रेम ती नाही हे कदाचित तुम्हाला पटणार नाही. 2008 मध्ये रोहित शर्मा लक्षवेधी खेळाडू असल्यामुळे त्याला स्पोर्ट्स ब्रँडमधील तगड्या कंपनीने जाहिरातीची ऑफर दिली होती. त्याच्या जोडीला युवराज सिंह आणि इरफान पठाण ही मंडळीही होती. या तिघांना एकाच वेळी शुटिंगसाठी बोलवण्यात आले होते. याचं सर्व काम पाहत होती ती म्हणजे रितिका. ती स्पोर्ट्सशी संबंधित एका कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे बऱ्याचदा तुम्ही ऐकले असेल. युवराज आणि भज्जी हे या शुटसाठी अगदी दिलेल्या वेळेत पोहचले. मात्र, रोहित उशिराने आला. 

बॉलिवूडमधील रंगीला गर्लच्या गाण्यावर युजीच्या धन्नोचा धम्माल डान्स (VIDEO)

पहिल्या नजरेतच रितिका त्याच्या मनात बसली. यावेळी युवीने त्याची फिरकीही घेतली होती. "इसकी तरफ देखना भी मत... बहन है मेरी"  
युवीनं या वाक्यासह रितिकाची ओळख करून दिली आणि शुटिंगला सुरुवात झाली. सर्व शुटिंग आटोपल्यानंतर रोहितचा माईक बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रोहित चांगलाच संतापला. त्याला पुन्हा रिटेक कराव लागलं. बंद झालेल्या माईकमुळे रोहित-रितिका यांच्यात झालेला संवाद हळू-हळू फुलत गेला. दोघांचा आता विवाह झाला आहे. या स्विट कपलला एक गोंडस मुलगीही आहे. रोहितच्या दमदार परफॉमन्सवेळी रितिका प्रेक्षक गॅलरीतून त्याला प्रोत्साहनही देताना अनेकदा पाहिले असेल. गोड प्रेम कहाणी समजल्यानंतर रोतिका रोहितची पहिलं प्रेम नाही हे म्हटल्यावर तुम्ही निश्चितच थोड बुचकळ्यात पडाल. 

पुण्यातील एका कार्यक्रमात रोहितची एका प्रतिष्ठित क्रिकेट समीक्षकाने मुलाखत घेतली होती. या कार्यक्रमात त्याच्या फलंदाजीचे कौतुक करताना रितिकाला तू पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले आहेस का? असा बाऊन्सर त्याला मारण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्या सर्वांच्या नजरा रोहित काय सांगतोय यावर खिळल्या. एक तर रोहित कमी बोलतो. त्यात जेव्हा बोलतो तेव्हा तो समोरच्याला गृहित धरून बोलतो. त्यामुळे तो काही बोलायच्या आतच बाउन्सर मारणाऱ्यानेच याचा खुलासा केला. ज्या क्रिकेटने त्याला ओळख मिळवून दिली. त्या खेळात त्याला साथ देणारी बॅट ही तुझं पहिलं प्रेम आहे. याबाबत रितिकाला कल्पना दिली होतीस का? असा प्रश्न उपस्थितीत करून तमाम प्रेक्षकांच्या डोक्यात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला होता.


​ ​

संबंधित बातम्या