कोण होती प्रियांका झा? MS धोनीची रिअल लव्हस्टोरी

आशिष कदम
Sunday, 14 February 2021

यशाचं शिखर गाठणाऱ्या आणि अफाट प्रसिद्धी मिळालेल्या या खेळाडूच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे.

ज्या देशात क्रिकेटला धर्म मानला जातो, त्या भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू जन्माला आले. त्यापैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारताला जगज्जेतं बनवलं. आयसीसीच्या  सर्वच ट्रॉफी त्यानं भारताला जिंकून दिल्या. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. यशाचं शिखर गाठणाऱ्या आणि अफाट प्रसिद्धी मिळालेल्या या खेळाडूच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित 'धोनी- द अनटोल्ड स्टोरी' हा एक बायोपिक येऊन गेला. त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली.

आज व्हॅलेंटाईन डे. आणि धोनीच्या या बायोपिकमध्येही 'व्हॅलेंटाईन'चा संदर्भ देण्यात आला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या धोनीच्या पहिल्या प्रेमाबद्दल फार कुणाला माहिती नाही. धोनीची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? ते एकमेकांना कधी भेटले? तिचा मृत्यू अॅक्सिडेंटमध्येच झाला का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. 

प्रत्येक यशस्वी माणसाचा एक भूतकाळ असतो, तसाच धोनी अर्थात सर्वांच्या लाडक्या माहीचा देखील आहे. माही नसता तर भारतीय क्रिकेट कसं असलं असतं, माही नसता तर 'धोनी द अनटोल्ड स्टोरी बनली नसती, आणि सुशांतसिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली नसती. माही नसता तर... असे अनेक जर-तर समीकरणातील प्रश्न अनुत्तरित राहिले असते. जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या माहीच्या भूतकाळाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी 'धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा बायोपिक बनवला. क्रिकेटमध्ये अढळ स्थान निर्माण केलेल्या माहीच्या वैयक्तिक आयुष्याचे अनेक कंगोरे या चित्रपटात दाखवण्यात आले. 

Valentine Week Special : रितिका नव्हे तर हे आहे रोहितचं पहिलं प्रेम 

2002 मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे माहीच्या आयुष्यात उलथापालथ झाली. होय, महेद्रसिंह धोनी आणि त्याची पहिली गर्लफ्रेंड प्रियांका झा हे एकमेकांवर प्रेम करत होते. धोनीनं त्यांच्या या नात्याबद्दल कधीच जाहीर कबुली दिली नाही. तसं पाहिलं तर धोनी त्याच्या खासगी आयुष्यातील या विषयावर कधी बोलतही नाही, पण त्याच्या डायहार्ड फॅन्सना त्याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत. 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं आपण ऐकलं आहे. ते धोनीबाबतही खरं आहे. प्रियांका झा ही धोनीचं फक्त पहिलं प्रेम नव्हती, तर ती त्याची स्ट्रेन्थ होती. जेव्हा माही २० वर्षांचा होता, तेव्हा प्रियांकाशी त्याची भेट झाली. इंडिया इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी माहीची धडपड सुरू असतानाच तो प्रियांकाच्या प्रेमात पडला होता. असं म्हणतात की, दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णयही घेतला होता. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. 

बॉलिवूडमधील रंगीला गर्लच्या गाण्यावर युजीच्या धन्नोचा धम्माल डान्स (VIDEO)

माही आणि प्रियांका यांच्या नात्याला जेव्हा बहर येत होती, त्याचवेळी 2003-04मध्ये धोनीची झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी भारत-अ संघात निवड झाली होती. विकेटकीपर बॅट्समन म्हणून धोनीने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या होत्या. या तिरंगी मालिकेत धोनीने 6 मॅचमध्ये 362 धावा जमवत बीसीसीआयलाही दखल घ्यायला लावली होती. 2004 च्या बांगलादेश दौऱ्यासाठी तत्कालीन टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीने त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलेल्या माहीच्या आयुष्यात यावेळी अनेक घडामोडींना वेग आला होता. 

प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत असणाऱ्या धोनीने त्याच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती गमावली होती, हे त्यालाही माहीत नव्हतं. हो हे खरं आहे. जिच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवायचा निर्णय घेतला होता, त्या लेडीलव्ह प्रियांकाचे एका अपघातात निधन झाले होते. जेव्हा माही दौऱ्यावरून परतला होता, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला याबाबतची माहिती दिली. प्रियांकाचा अपघाती मृत्यू झाल्याचं ऐकताच माही पूर्णपणे कोसळला. प्रियांकाशी लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्या माहीनं त्याचं पहिलं प्रेम गमावलं होतं. प्रियांका त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती कायमची. 

या धक्क्यातून सावरायला खूप वेळ गेला, पण शांत, संयमी असलेल्या माहीनं भावना कंट्रोल करत पुन्हा क्रिकेटकडे आपला फोकस वळवला आणि त्यानंतर जे काही घडलं तो भारतीय क्रिकेट इतिहासातील अध्याय बनत गेला. 

भारताला जगज्जेता बनवणाऱ्या या महान खेळाडूनं नंतर साक्षीसोबत लग्न केलं. त्याला झिवा नावाची मुलगीही आहे. धोनी- द अनटोल्ड स्टोरीमध्ये धोनीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा देण्यात आला आहे. प्रियांका या जगात नाहीय. पण संपूर्ण भारत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करणारा आणि यशाची शिखरं गाठणारा धोनी आजही प्रियांकावर तेवढंच प्रेम करतो.  

कितीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली असली तरीही बर्फासारखा थंड आणि पहाडासारखा खंबीर राहणाऱ्या धोनीसारखं मैदानात वावरणं कुणाला जमलंच नाही. अनेक चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनी त्याला असं बनवलं असेल कदाचित. 
 


​ ​

संबंधित बातम्या