नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उमेश यादवला मिळाली गुड न्यूज

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 1 January 2021

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची पत्नी तान्याने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची पत्नी तान्याने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उमेश यादवने सोशल मीडियावरील ट्विटर वरून याबाबतची माहिती शेअर केली आहे. उमेश यादवने ट्विटरवर लहान मुलीचा फोटो शेअर करतानाच, 'इट्स अ गर्ल' असे लिहिले आहे. 

उमेश यादव भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. आणि भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागले होते. शिवाय सामन्यानंतर घेण्यात आलेल्या स्कॅनवरून उमेश यादव मालिकेच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये खेळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याच्या जागी मोहम्मद सिराज तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात खेळताना दिसणार असून, उमेश यादव मायदेशी परतला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनीत खेळवण्यात येणार आहे. आणि नुकतेच या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. . टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. आणि त्यामुळे उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दूल ठाकूर मैदानात उतरणार आहे. 

Target_2021 : "झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित...

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली देखील पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय, टी-ट्वेन्टी मालिका आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहलीला बीसीसीआयने रजा मंजूर केली होती. त्यानंतर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर होती. व या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आहे.        


​ ​

संबंधित बातम्या