IPL 2020 : राजस्थान रॉयल्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात 'बिर्याणी' वॉर  

टीम ई-सकाळ
Saturday, 24 October 2020

यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात 40 वा सामना खेळवण्यात आला.

यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात 40 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सन रायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकात सहा गडी गमावत 154 धावा केल्या. यानंतर हैदराबादच्या संघाने हे लक्ष 19 व्या ओव्हर मधेच 8 विकेट्स राखत गाठले. त्यामुळे हैदराबादच्या संघाने राजस्थानवर विजय मिळवत पहिल्या फेरीतील सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड केली. आणि यासोबतच हैदराबाद संघाने सोशल मीडियाच्या ट्विटरवर देखील एक मजेशीर ट्विट करत राजस्थान संघाने केलेल्या ट्विटची परतफेड केली. 

IPL 2020 : कटू आठवणींसह चेन्नईच्या दिग्गजांना सोडावे लागेल मैदान

आयपीएल मधील पहिल्या फेरीत झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात राजस्थानने विजय मिळवला होता. राजस्थान आणि  हैदराबाद यांच्यात दुबई झालेल्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर 158 धावांचे लक्ष राजस्थान समोर दिले होते. हे लक्ष राजस्थानने 5 विकेट्स राखत गाठले होते. व त्यानंतर राजस्थानच्या संघाने सोशल मीडियाच्या ट्विटरवरून एक मजेशीर ट्विट केले होते. या ट्विट मध्ये राजस्थानने हैदराबादी बिर्याणीची ऑर्डर मागविली होती. व त्यात राजस्थानने ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोला देखील टॅग केले होते. शिवाय विजयाचा आनंद व्यक्त करतानाच राजस्थानने लोकेशन देताना फक्त आणि फक्त रॉयल राजस्थान असा कॅप्शन देखील दिला होता. 

त्यानंतर काल झालेल्या राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादच्या संघाने राजस्थानवर 11 चेंडू आणि 8 विकेट्स राखत विजय मिळवला. या विजयानंतर सन रायझर्स हैदराबादच्या संघाने राजस्थानने मागे केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. या रिप्लाय मध्ये हैदराबादने बिर्याणी ऑर्डर रद्द करा असे म्हणत, आमच्या हसऱ्या मित्रांना एवढी 'स्पाईस बिर्याणी' सहन होणार नसल्याचे लिहिले आहे. तसेच पुढे हैदराबादने या ट्विट मध्ये तळटीप देत डाळ बाटीच ठिक असल्याचे म्हटले आहे. 

हैदराबादची बिर्याणी ही सगळीकडेच प्रसिद्ध आहे. तर डाळ बाटी ही डिश राजस्थान मध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. दरम्यान, सन रायझर्स हैदराबाद संघाने आत्तापर्यंत दहा सामने खेळले आहेत आणि त्यांपैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. व सहा सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला असून, हैदराबादचा सामना उद्या किंग्स इलेव्हन पंजाब सोबत होणार आहे. याव्यतिरिक्त राजस्थान संघाने 11 सामने खेळले आहेत. आणि 11 पैकी चार सामन्यात विजय मिळवलेला आहे.  
                

 


​ ​

संबंधित बातम्या