बॉलिवूडमधील रंगीला गर्लच्या गाण्यावर युजीच्या धन्नोचा धम्माल डान्स (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

नुकतेच हे कपल हनीमूनसाठी दुबईलाही गेल्याचे पाहायला मिळाले होते. याठिकाणी या स्विट कपलने कुल कॅप्टन धोनीची भेट घेतल्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती.

भारतीय संघातील स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आपल्या धमाकेदार डान्स परफॉमन्सने चांगलीच चर्चेत असते. 26 जानेवारीच्या दिवशी देशवासियांना हटके अंदाजात शुभेच्छा दिल्यानंतर आता तिने चायना गेट चित्रपटात रंगिला गर्ल उर्मिला ज्या गाण्यावर थिरकली होती त्या गाण्यावर धम्माल डान्स केलाय. तिच्या मूव्हज कमालीच्या असून हा व्हिडिओ तिने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. 

धनश्री वर्माने इंन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात ती 'छम्मा छम्मा' या गाण्यावर थिरकताना दिसते. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आणखी दोन तरुणीही दिसताहेत. व्हिडिओ शेअर धनश्रीने या दोघींनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह पार पडला होता.

नुकतेच हे कपल हनीमूनसाठी दुबईलाही गेल्याचे पाहायला मिळाले होते. याठिकाणी या स्विट कपलने कुल कॅप्टन धोनीची भेट घेतल्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. धनश्रीची ओळख ही केवळ स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल हिची पत्नी एवढीच नाही. तर ती स्वत: डॉक्टर असून कोरिओग्राफरही आहे. सोशल मीडियावर तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल असून यावरही ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तिचे व्हिडिओ बघणाऱ्याला ती एक डॉक्टर आहे असे सांगितल्यावर कदाचित विश्वासही बसत नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या