चाहत्यांनो भानावर या ; टीका करायची ही कसली भाषा ?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला पराभव पत्करावा लागला.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला पराभव पत्करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 168 धावांचे लक्ष चेन्नई समोर ठेवले होते. मात्र चेन्नईचा संघ 157 धावांपर्यंतच पोहचू शकला. या सामन्यानंतर कर्णधार धोनीसह सीएसकेचे काही फलंदाज आता चाहत्यांच्या टीकेचे बळी ठरले आहेत. आणि खासकरून सीएसकेचा खेळाडू केदार जाधववर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यादरम्यान कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व त्यानंतर राहुल त्रिपाठीच्या खेळीमुळे कोलकाताने 168 धावांपर्यंत मजल मारली. परंतु चेन्नईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावत 157 धावाच करू शकला. यावेळेस चेन्नईच्या केदार जाधवने 12 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून चांगलीच टीका केली आहे. मात्र यावेळेस चाहत्यांनी टीका करताना आपली मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले आहे.
IPL 2020 : पूरनचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला!
चाहत्यांनी टीका करताना धोनीबरोबर त्याच्या पाच वर्षाची मुलगी जीवाविरूद्ध देखील लाजीरवाणी टिप्पण्या केल्या आहेत. खेळाडूंच्या निकृष्ट कामगिरीमुळे सोशल मीडियावर कुटुंबियांनाही ट्रोलकरण्यात आल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आवडता संघ हरल्यावर त्यांच्या मुलांनाही लक्ष्य केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहा सामने खेळले असून, त्यांपैकी चार सामन्यात चेन्नईला हार पत्करावी लागली आहे. याव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी देखील आत्तापर्यंतच्या सामन्यांमध्ये कोणतीच कमाल दाखवू शकलेला नाही. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांनी आपला रोष सोशल मीडियावर व्यक्त केला. परंतु यावेळेस त्यांनी मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही संघाला फॉलो करताना त्या संघावर किंवा इतर संघावर टीका करत असताना चाहत्यांनी भान बाळगणे गरजेचे आहे. खेळ भावना लक्षात घेऊन खालच्या पातळीवर टीका होणार नाही चाहत्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
त्यानंतर असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना एका चाहत्याने, भानावर या आणि टीका करायची ही कसली भाषा ? असा प्रश्न विचारत चांगलेच सुनावले आहे.