ॐ नम: शिवाय। म्हणत क्रिकेटरने चाहत्यांना दिली गोड बातमी!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 September 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा नुकताच बाबा झाल्याचे वृत्त समोर आले होते. हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. पण आरपीने मात्र आपल्या अपत्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले दिसत नाही. 

मुंबई : भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज रुद्र प्रताप (आर पी) सिंहच्या घरी नवा पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी देवांशी हिने एका मुलाला जन्म दिला आहे. आरपी सिंह आणि देवांशी यांचे हे दुसरे अपत्य आहे. आरपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत असून नेटकरी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. 

सासू-सुनेच्या लोकप्रिय गाण्यावर 'युजी-धन्नो'ची धम्माल मस्ती

आर पीने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,  ‘परमेश्वराच्या कृपेनं मला आणि पत्नी देवांशी यांना पुत्ररत्न लाभले. ॐ नम: शिवाय।'. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा नुकताच बाबा झाल्याचे वृत्त समोर आले होते. हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. पण आरपीने मात्र आपल्या अपत्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले दिसत नाही. 

चहलच्या 'लाइफ पार्टनर'चा चक्क PPE किटमध्ये डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

आरपी सिंहने 2005 मध्ये राष्ट्रीय वनडेत तर 2006 मध्ये कसोटी संघात पदार्पण केले होते. सातत्याने सहा वर्षे तो भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून त्याने  82 सामन्यात 100 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या घडीला तो क्रिकेट विश्लेषक म्हणून कार्यरत असल्याचे पाहायला मिळते.  


​ ​

संबंधित बातम्या