रोहितनं Unfollows करुनही विराट अजूनही त्याला Follows करतोय हे तुम्हाला माहितेय?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

सध्याच्या घडीला रोहित आणि विराट ही जोडी मैदानात एकत्र वावरत असली तरी त्यांच्यातील नात्यासंदर्भात संभ्रमाचे वातवरण आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 10 कोटी (100 मिलियन) फॉलोअर्स झाले आहेत. मिलियनच्या घरात चाहता वर्ग असलेला विराट कोहली मोजक्या मंडळींना Follows करतो. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पत्नी अनुष्का शर्मा, केन विल्यम्सन आणि अन्य काही टीम सहकार्यांसोबतच रोहित शर्माचाही समावेश आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये इंग्लंडच्या मैदानात रंगलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलनंतर रोहित आणि विराट यांच्यात दूरावा निर्माण झाल्याचे वृत्त पसरले होते. सध्याच्या घडीला रोहित आणि विराट ही जोडी मैदानात एकत्र वावरत असली तरी त्यांच्यातील नात्यासंदर्भात संभ्रमाचे वातवरण आहे. 
May be an image of 4 people, screen and text that says 'Following PEOPLE HASHTAGS rohitsharma45 Rohit Sharma Following iammickeysingh MICKEY SINGH Follow garethbale11 Gareth Bale Follow officialcsfilms Clean Slate Filmz Follow audi Audi USA puma S Follow Follow'

विराट vs रोहित इन्स्टा एक्टिव्हिटी

100 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केलेल्या विराट कोहलीनं आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन हजारहून अधिक पोस्ट केल्या आहेत. तो ज्या व्यक्तिंना फॉलो करतो त्यांचा आकडा 198 इतका आहे. यात रोहित शर्माचाही समावेश आहे. दुसरीकडे 17.5 फॉलोवर्स असलेल्या रोहित शर्माने इन्स्टा अकाउंटवरुन 898 पोस्ट केल्या आहेत. विराट कोहलीपेक्षा कमी लोकांना फॉलो करतो. पत्नी रितिका सजदेहसह टीममधील मोजक्या सहकाऱ्यांसह रोहित शर्मा 107 जणांना फॉलो करतो.  

कोहलीचे आणखी एक ‘शतक’ इंस्टावर 10 कोटी फॉलोअर्स

May be an image of one or more people and text
विराटच्या यादीत रोहित पण...

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीच्या यादीत रोहित शर्मा आहे. पण रोहित शर्मा कर्णधाराला फॉलो करत नाही. इंग्लंडमध्ये रंगलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहित शर्मा हा  विराट-अनुष्का दोघांनाही फॉलो करत होता. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच त्याने विराट कोहलीला अनफॉलो केले होते. पण अनुष्का शर्माला तो फॉलो करत होता. वर्ल्ड कपच्या दरम्यान विराट-रोहित यांच्यातील वादाची चर्चा रंगत असताना रोहितने अनुष्काला अनफॉलो केल्याचे समोर आले होते. अनुष्का शर्माने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून रोहितला उत्तर दिले होते. आजही कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माला अनफॉलो केलेले नाही. 


​ ​

संबंधित बातम्या