सोशल मीडियावर रंगली क्रिकेटच्या मैदानातील डॉगीच्या एन्ट्रीची चर्चा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 14 November 2020

ट्विटर यासंदर्भातील फोटो व्हायरल होत असून नेटकरी यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. बाबर आझमने या सामन्यात  65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत स्पर्धेत सर्वाधिक शतक करणारा फलंदाजही ठरला.

पाकिस्तान सुपर लीग 2020 का क्वालिफायर (PSL 2020 Qualifier) मधील मुल्तान सुल्तान्स आणि कराची किंग्ज (Multan Sultans vs Karachi Kings) यांच्यात सामना रंगला होता.  कराची किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  मुल्तान सुल्तान्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटराक  7 बाद 141 धावा केल्या.  रवि बोपाराने  31 चेंडूत 40 धावांची केलेली खेळी महत्त्वपूर्ण ठरली.  कराची किंग्जकडून खेळणाऱ्या बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयाची दारे उघडली.  

एका बाजूला बाबर आझमच्या Babar Azam खेळीनं लक्षवेधलं तर दुसऱ्या बाजूला सामना सुरु असताना मैदानात  कुत्र्याने एन्ट्री मारल्याची चर्चाही सोशल मीडियावर चांगलीच रंगली. डॉगी मैदानात आल्यामुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्राउंड स्टाफला चांगलीच कसरत करावी लागली. प्रेक्षकांना परवानगी नसताना कुत्र्याने मैदानात मारलेला फेरफटका चर्चेचा विषय बनला आहे. ट्विटर यासंदर्भातील फोटो व्हायरल होत असून नेटकरी यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. बाबर आझमने या सामन्यात  65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत स्पर्धेत सर्वाधिक शतक करणारा फलंदाजही ठरला.


​ ​

संबंधित बातम्या