अभिनेत्री पृथ्वीवर फिदा; पृथ्वीही देतोय रिप्लायवर रिप्लाय...

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 September 2020

भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व करणारा पृथ्वी शॉची अभिनेत्रीने विकेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. 

क्रीडा डेस्क : क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यातील कनेक्शन नवं नाही. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीपासून ते संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यापर्यंत अनेक क्रिकेटर्संची नावे बॉलिवूड सेलिब्रिटीशी जोडली गेल्याचे पाहायला मिळाले आहे. विराटसह  युवी, भज्जी, झहीर खान यांसारख्या क्रिकेटर्संनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत फुललेल्या प्रेमाचे विवाहात रुपांतर करुन आयुष्याची नवी इनिंगही सुरु केली. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व करणारा पृथ्वी शॉची अभिनेत्रीने विकेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. 

मुंबई इंडियन्सनं शेअर केला रोहित-रितिका आणि त्यांच्या लेकीचा खास फोटो

पृथ्वी शॉ आणि छोट्या पद्यावरील अभिनेत्री प्राची सिंह यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.  सोशल मीडियावर दोघांच्यातील संवाद दोघांच्यात काही तरी शिजतं असल्याचे चर्चेत भर पडत आहे. अभिनेत्री प्राची सिंह पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर फोटोवर सातत्याने रिप्लाय देत असल्याचे दिसते. पृथ्वी शॉही तिला प्रतिसाद देतोय.  यावरुनच दोघांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दोघांनी अधिकृतपण्या यासंदर्भात कोणतही भाष्य केलेलं नाही.  

UAE त रंगणाऱ्या IPL चं संपूर्ण वेळापत्रक, आबूधाबीच्या मैदानात रंगणार सलमीचा सामना​

नवोदित अभिनेत्री अद्याप मोठ्या ब्रेकच्या प्रतिक्षेत आहे. सध्याच्या घडीला ती कलर्स चॅनेलवर झळकणाऱ्या आगामी 'उडान' या मालिकेत दिसणार आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉने 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळवून प्रकाश झोतात आला होता. धमाकेदार फलंदाजी करण्याची क्षमता असल्या पृथ्वीकडून आयपीएलमध्ये धमाकेदार खेळीची अपेक्षा आहे.  


​ ​

संबंधित बातम्या