पाक क्रिकेटर चालू मॅच सोडून टॉयलेटकडे धावला; व्हिडिओ होतोय व्हायरल 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 15 November 2020

क्रिकेटच्या मैदानात घडलेला हास्यास्पद प्रकारासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 12 व्या षटकात मोहम्मद हाफिज ड्रेसिंग रुमकडे धावत गेला. दरम्यान पेशावरचा वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब मलिक मैदानावरच आपापसात बोलत होते. कमेंटेटर रमीज रियाज यांनी या तिघांशी चर्चा केली.

कोरोनातून सावरत पाकमध्येही क्रिकेटला सुरुवात झाली. पाकिस्तान सुपर लीगमधील काही घटनांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  शनिवारी लाहोर कलंदर्स आणि पेशावर जल्‍मी यांच्यात झालेल्या  एलिमिनेटर सामन्यात एक हास्यास्पद गोष्ट घडली. पेशावरच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लाहोर कलंदर्सच्या मोहम्मद हाफीजला बाथरुमला जायचे होते. 12 व्या षटकात त्याच्यासाठी सामना थांबण्याची नामुष्की ओढावली. पाकिस्तान क्रिकेटर्स यापूर्वी अजब गजब पद्धतीने धावबाद झाल्याच्या घटना आपण अनेदा पाहिल्या असतील पण क्रिकेटच्या मैदानात असा प्रकार घडण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.

क्रिकेटच्या मैदानात घडलेला हास्यास्पद प्रकारासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 12 व्या षटकात मोहम्मद हाफिज ड्रेसिंग रुमकडे धावत गेला. दरम्यान पेशावरचा वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब मलिक मैदानावरच आपापसात बोलत होते. कमेंटेटर रमीज रियाज यांनी या तिघांशी चर्चा केली.

 यावेळी इमाम म्हणाला की, फलंदाजी करत असलेला मोहम्मद हाफिज मागील दोन षटकांपासून सू-सू आल्याचे सांगत होता. त्याने ही गोष्ट सांगताच  रियाज, इमाम आणि राजा हसू लागले.  
हास्यास्पद घटनेनंतर मोहम्मद हाफिजने आपल्या संघासाठी  74 धावांची नाबाद खेळी करत लाहोरच्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 171 धावांचे लक्ष्य पाच विकेट राखून पार केले.  

​ ​

संबंधित बातम्या