लेकीविषयी पसरलेल्या अफवांमुळं आफ्रिदी भडकला!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला आफ्रिदी 2 डिसेंबरला स्पर्धा सोडून मायदेशी परतला होता. अवघ्या एका आठवड्यात स्पर्धेतून माघार घेण्याचे कोणतेही सविस्तर कारण आफ्रिदीने सांगितले नव्हते.

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) लेकीविषयी पसरत असलेल्या बातम्यांमुळे चांगलाच संतापलाय. मुलीविषयी चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदीची मुलगी आजारी असल्याचा प्रसार सोशल मीडियावरुन केला जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून माझ्या मुलीला काहीही झालेलं नाही, असे स्पष्टीकरण आफ्रिदीने दिले आहे. 

पाकिस्तानमधील टीव्ही चॅनल जिओने दिेलेल्या वृत्तानुसार, आपल्या मुलीच्या आजारासंदर्भात पसरणाऱ्या अफवांमुळे आफ्रिदी नाराज आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी जबाबदार होणे गरजेच आहे, असेही आफ्रिदी म्हटलंय. माझ्या मुलीला कोणत्याही आजाराने ग्रासलेलं नाही. ती बरी असून कृपया खोट्या अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्याने केलय. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या युवा क्रिकेटरने उडवला लग्नाचा बार!

श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला आफ्रिदी 2 डिसेंबरला स्पर्धा सोडून मायदेशी परतला होता. अवघ्या एका आठवड्यात स्पर्धेतून माघार घेण्याचे कोणतेही सविस्तर कारण आफ्रिदीने सांगितले नव्हते. वैयक्तिक कारणास्तव मायदेशी जावे लागत असून लवकरच स्पर्धेत परत येण्याचा प्रयत्न करेन, असे आफ्रिदीने म्हटले होते. त्याने लंका प्रीमियरमधून माघार घेतल्यानंतर आफ्रिदीची मुलगी रुग्णालयात असल्याचे वृत्त पसरले होते.

मुलगी रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या असताना आफ्रिदी रुग्णालयात दाखल झाल्याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता  हे वृत्त आफ्रिदीने फेटाळून लावले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये आफ्रिदीला पाचवे कन्यारत्न झाले. दोन दशक पाकिस्तान संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आफ्रिदाला एकूण पाच मुली आहेत.  
 


​ ​

संबंधित बातम्या