धोनीनंतर आता मुथय्या मुरलीधरनचा येणार बायोपिक ; साऊथचा अभिनेता साकारणार भूमिका 

टीम ई-सकाळ
Thursday, 8 October 2020

सिनेजगत आणि क्रिकेट यांच्यातील नाते जुने आहे. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सामन्यांप्रमाणे चित्रपट सृष्टीतील देखील अनेकांचा समावेश होतो.

सिनेजगत आणि क्रिकेट यांच्यातील नाते जुने आहे. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सामन्यांप्रमाणे चित्रपट सृष्टीतील देखील अनेकांचा समावेश होतो. आणि त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील काही संघांचे मालक हे फिल्म जगतातील आहेत. याशिवाय क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेक जणांच्या जीवनावर चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर आलेला चित्रपट 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चांगलाच गाजला. 

महेंद्रसिंग धोनी नंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि अशा अनेक बड्या खेळाडूंवर बायोपिक बनविण्यात आले आहे. आणि आता यात आणखी एका बायोपिकचे नाव जोडले जाणार आहे. श्रीलंका आणि क्रिकेट विश्वाचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. व मुथय्या मुरलीधरनचे पात्र मोठ्या पडद्यावर तमिळ स्टार विजय सेतूपती साकारणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील ट्विटरवरून मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बायोपिक करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी या चित्रपटात तमिळ अभिनेता विजय सेतूपती मुरलीधरनच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय, रमेश बाला आणि तरण आदर्श यांनी मुथय्या मुरलीधरनच्या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट केले असून, त्यात मुरलीधरनची ऍक्शन दाखविण्यात आली आहे. अभिनेता विजय सेतूपती दक्षिण भारताचा सुपरस्टार मानला जातो. तर त्याचे चाहते देखील जगभरात सगळीकडे आहेत. दुसरीकडे क्रिकेट विश्वातील महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनदेखील क्रिकेटप्रेमींच्या मनावर आज देखील राज्य करतो.

मुरलीधरनचे भारताशी दीर्घकाळचे संबंध आहेत. मुरलीधरनने 2005  मध्ये चेन्नईच्या मधिमलार राममूर्तीशी लग्न केले आहे. आणि मुथय्या मुरलीधरन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सल्लागार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या