धोनीलाही बर्ड फ्लूची धास्ती; कडकनाथची ऑर्डर केली कॅन्सल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुकूट पालनाचा उद्योग सुरु केला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुकूट पालनाचा उद्योगही सुरु केला आहे. मात्र आता बर्ड फ्लूमुळे त्याचा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्याने मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्याकडून कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांची ऑर्डर केली होती. 10 जानेवारीला ही ऑर्डर पूर्ण करायची होती. पण देशात डोकेवर काढत असलेल्या बर्ड फ्लूमुळे त्याला ही ऑर्डर रद्द करावी लागली आहे. सध्याच्या घडीला धोनीच्या पोल्ट्री फर्ममध्ये असलेले सर्व कडकनाथ कोंबडे सुरक्षित असल्याची समजते.  

धोनीने मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्याकडून कडकनाथ कोंबड्यांची मोठी ऑर्डर केली होती. कडकनाथ चिकन आरोग्यासाठी चांगले असते. यात फॅटची मात्र कमी असते. त्यामुळेच हे इतर चिकनच्या तुलनेत याची किंमतही अधिक असते. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांने एका वर्तमान पत्राला दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या मॅनेजरने कॉल केला होता. हा कॉल  कृषी विकास केंद्र आणि कडकनाथ मोबाइल एपच्या माध्यमातून करण्यात आला होता. यावेळी 1000 कडकनाथची ऑर्डर देण्यात आली. 10 जानेवारीला याची ऑर्डर द्यायची होती. 

ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी

धोनीच्या फॉर्म हाऊस मॅनेजरने सर्व डिल पक्की केली होती, अडवान्स रक्कमही देण्यात आली. धोनीसारख्या लोकप्रिया क्रिकेटर्सने आपल्याला ऑर्डर दिली याचा अभिमान वाटला, असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे. महेंद्र सिंह धोनीने 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्डकपमध्ये शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये तो धाव बाद झाला. ही अधूरी धाव त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची ठरली. 15 ऑगस्ट 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्जकडून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या