'पडोसन'ला गळ टाकणाऱ्या विराटला टिप्स देतोय धोनी; व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

'पडोस'न चित्रपटातील 'मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टुकडा रहता है' हे गाणं तर सगळ्यांनाच माहित आहे. याच गाण्यावर धोनी आणि कोहली यांनी ताल धरल्याचे दाखविण्यात आले आहे.

MS Dhoni Virat Viral Video :  भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार  विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांच्या मिम्सचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोहली आणि धोनी यांचा इडिट करण्यात आलेला  व्हिडिओ सोशल मीडियात अक्षरश: धुमाकूळ घालतोय. 

प्रसिद्ध गायक किशोरकुमार आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्या 'पडोस'न चित्रपटातील 'मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टुकडा रहता है' हे गाणं तर सगळ्यांनाच माहित आहे. याच गाण्यावर धोनी आणि कोहली यांनी ताल धरल्याचे दाखविण्यात आले आहे. किशोर कुमार यांच्या भूमिकेत आहे धोनी, तर सुनील दत्त यांच्याजागी विराट दिसतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ShareChat (@sharechatapp)

 'झिरो टू आयर्न मॅन'चा पहिला एपिसोड; आयर्न मॅन स्पर्धा म्हणजे नक्की काय?

हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हीदेखील पोट धरून हसाल. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्याच्या तोंडून हेच ऐकू येत आहे ते म्हणजे, 'ज्यानं कुणी हे बनवलंय त्यानं कमाल बनवलंय. भावा एक नंबर, व्हिडिओ इडिटरला एखादा पुरस्कार देऊन टाका,' असंही काही जणांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला मुलगी झाली. विरुष्का आणि दोघांच्या चाहत्यांनीही आनंद साजरा केला. त्यानंतर आता विराट आणि धोनीच्या या व्हिडिओमुळे त्यांचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. या व्हिडिओला खूप लोकप्रियता मिळत आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या