रशियन ब्यूटीचा साखरपुडा लग्नापर्यंत पोहचणार का?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

मारिया शारापोव्हाच्या बॉयफ्रेंडची लिस्टही खूप मोठी आहे. तिच्यासोबत अनेक जणांची नावे जोडली गेली आहेत.

वयाच्या अवघ्या 32 व्या अचानकपणे टेनिस कोर्ट सोडण्याचा निर्णय घेत अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या रशियन ब्यूटीने आपल्या आयुष्यात एक मोठा निर्णय घेतलाय. शाही घराण्याशी संबंध असलेल्या आपल्या प्रियकरासोबत तिने नुकताच साखरपुडा उरकल्याचे वृत्त आहे. यापूर्वी 2018 मारिया शारापोव्हाने अलेक्झंडर गिलक्स याच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबूली दिली होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अलेक्झांडसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यापूर्वी तिला अनेकदा प्रेमसंबंधाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. मात्र तिने मौन पाळल्याचे पाहायला मिळाले होते.  

गिलक्स याचे ब्रिटिशमधील शाही घराण्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रिन्स हॅरी आणि विलियम्स यांच्यासोबत त्याची चांगली मैत्री आहे.  गिलक्सची पहिली पत्नी मिशा नूनू हिने त्याची हॅरीची ओळख करुन दिली होती. मारिया शारापोव्हाच्या बॉयफ्रेंडची लिस्टही खूप मोठी आहे. तिच्यासोबत अनेक जणांची नावे जोडली गेली आहेत.

AUS vs IND : 9 8 4 4 4 2 0 0 0 4 मोबाईल नंबर नव्हे.. हे तर टीम इंडियाचं स्कोअरकार्ड

 2008 मध्ये मारियाने टीव्ही सेलिब्रेटी असलेल्या  चार्ली एबरसोलसोबत विवाह थाटला. त्यानंतर तिने बास्केट बॉलच्या मैदानातील लोकप्रिय खेळाडू असलेल्या  साशा वुजानिक याच्याशी जवळीक वाढवली. दोघांनी साखरपूडाही उरकला पण या साखर पुड्याची गोष्ट लग्नापर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे या साखर पुड्यानंतर तिच्या लग्नाची गोष्ट ऐकायला मिळणार का? हे येणारा काळच ठरवेल. याशिवाय प्रसिद्ध सिंगर एडम लिवाईन याच्यासोबतही मारियाचे प्रेम संबंध होते.  

मारियाने यंदाच्या वर्षीच ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. ज्या कोर्टवर लहान असताना प्रशिक्षण घेतले ते आपण कसे सोडायचे. ज्या खेळावर प्रेम केले त्यापूसन दूर कसे जायचे असे अनेक प्रश्न मनात भेडसावत आहेत, अशा भावनिक शब्दात तिने टेनिस कोर्टला अलविदा केले होते.  


​ ​

संबंधित बातम्या