महेंद्रसिंग धोनी सध्या काय करतोय ? तुम्हीच पाहा (व्हिडिओ) 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षाच्या 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षाच्या 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. आणि चेन्नईचा संघ प्लेऑफ पूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. परंतु आता सध्याला धोनी क्रिकेटच्या मैदानापासून थोडा दूर आहे. व त्याने आपल्या शेतावर लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसत आहे. 

टीम इंडियावरील निर्बंध शिथिल होणार नाहीत; चौथ्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे ढग

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेंव्हा ही मैदानापासून दूर असतो त्यावेळी तो आपले आवडते छंद जोपासताना दिसतो. व त्यामुळेच सध्या धोनी आपल्या शेतात व्यस्त असल्याचे समोर आले आहे. कारण नुकतेच महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये धोनीने आपल्या शेतात फेरफटका मारत असल्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. व यात एमएस आपल्या शेतातील स्ट्राबेरी खात असल्याचे दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीने या पोस्टला एक मजेशीर कॅप्शन देखील दिला आहे. त्यात त्याने आपण जर असेच शेतात जात राहिलो तर मार्केट मध्ये जाईपर्यंत एकही स्ट्राबेरी शिल्लक राहणार नसल्याचे धोनीने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

दरम्यान, यापूर्वी महेंद्रसिंग धोनी शेतात ट्रॅक्टर चालवत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. भारताने महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. त्यामुळे धोनी हा जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकल्या आहेत.       


​ ​

संबंधित बातम्या