Mithali Raj Birthday :लेडी तेंडुलकर मितालीने लाईफ पार्टनरसंदर्भातील बाऊन्सरवर अशी दिली होती रिअ‍ॅक्शन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाची रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजने 26 जून 1999 मध्ये इंग्लंड मधील मिल्टन केयन्स येथे आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजने 26 जून 1999 मध्ये इंग्लंड मधील मिल्टन केयन्स येथे आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. या सामन्याच्या वेळी मिताली फक्त सोळा वर्षांची होती. आणि आयर्लंड विरुद्धच्या याच सामन्यात तिने दमदार खेळी करत नाबाद 114 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिने भारतीय संघाकडून खेळताना अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. त्यामुळे तिला भारतीय महिला क्रिकेट संघातील लेडी सचिन तेंडुलकर म्हटले जाते. 

मिताली राज आता 37 वर्षाची आहे. एका मुलाखतीत मिताली राजला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळेस मिताली राजने यासंदर्भात बोलताना कुटूंबातील सदस्य देखील लग्नाबद्दल विचार करण्यास सांगत असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबतीत आपण प्रेशर मध्ये येऊन कोणताही निर्णय घेणार नसल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय करियर मध्ये सक्सेस मिळवल्यानंतर आता लग्न करून सेटल होण्याऐवजी जास्तीत जास्त दिवस भारतासाठी खेळणार असल्याचे तिने नमूद केले. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिका पराभवाची कारणे

तसेच या ठिकाणी पोहचण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडल्या असल्याचे मितालीने या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे आपली जीवनशैली ही सर्वसाधारण मुली प्रमाणे नसल्याचे मिताली राजने म्हटले असून, लग्न केल्यानंतर आपल्या जोडीदाराने इतरांसारखे आपल्या कडून काही आशा ठेवल्यास ते अवघड होणार असलयाचे मितालीने यावेळेस स्पष्ट केले. मात्र आपल्याला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणारा आणि आहे तसे स्वीकार करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे ती या मुलाखतीत म्हणाली. 

AUSvsIND : तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने रचला इतिहास  

याव्यतिरिक्त, आपण लग्नासाठी कधीच तयार असल्याचे मितालीने यावेळी सांगितले. लग्नासाठी सर्व काही तयार आहे, वेळ आहे मात्र जोडीदारच नसल्याचे मितालीने या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. आणि आपले विचार जुळल्यास लगेच लग्न करण्यासाठी तयार असल्याचे ती पुढे म्हणाली. मात्र आपल्या आमिर खान हा अभिनेता आवडत असल्याचे सांगून, त्याचे लग्न झाले आहे. नाहीतर त्याच्याशीच लग्न केले असते, असे तिने सांगितले. 

दरम्यान, मिताली राजने भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना 209 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.54 च्या सरासरीने 6888 धावा केलेल्या आहेत. आणि यात तिच्या सात शतक आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच दहा कसोटी सामन्यांमध्ये 51 च्या सरासरीने 663 धाव केलेल्या आहेत.         


​ ​

संबंधित बातम्या